क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Lalbhaug Accident News : लालबाग राजाच्या दर्शनासाठी निघालेल्या वाहनाचा भीषण अपघात, 1 ठार, 5 गंभीर जखमी

Lalbhaug Latest Accident News : बंद पडलेल्या ट्रकला धडक दिल्याने घडला प्रकार; मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

मुंबई :- लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गुजरातहून निघालेल्या भाविकांच्या एका खासगी वाहनाचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. रस्त्यात बंद पडलेल्या एका ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला असून, यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत.

गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यातील सात मित्र लालबाग राजाच्या दर्शनासाठी खासगी वाहनाने निघाले होते. त्यांच्यामध्ये चिराग पटेल (वय 32) हा चालक होता आणि त्याच्या शेजारी हितेनभाई पटेल (वय 32) बसलेला होता. त्यांच्यासोबत मागील सीटवर पाच मैत्रिणी होत्या. बुधवारी सकाळी त्यांनी वडोदरा येथून आपला प्रवास सुरू केला.

सायंकाळी 7 च्या सुमारास त्यांचे वाहन मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील फाऊंटन हॉटेलजवळ पोहोचले. तिथे एक ट्रक (एमएच 03 सीवी 6268) रस्त्याच्या मधोमध (तिसऱ्या लेनमध्ये) उभा होता. ट्रक चालक सूर्यबली तिवारी (वय 58) याने ट्रक रस्त्याच्या बाजूला न लावता चुकीच्या पद्धतीने उभा केला होता. विशेष म्हणजे, त्याने पार्किंग लाईट किंवा इंडिकेटरही चालू ठेवले नव्हते.
भरधाव वेगात असलेल्या चिरागला हा ट्रक वेळेवर दिसला नाही. जेव्हा त्याला ट्रक दिसला, तेव्हा त्याने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांची गाडी जोरदार वेकेगाने ट्रकला जाऊन आदळली.

जखमी आणि मृतांची स्थिती

या भीषण अपघातात चालकाशेजारी बसलेल्या हितेशभाई पटेल (वय 32) याचा जागीच मृत्यू झाला. वाहनाचा चालक चिराग पटेल याने अपघातापूर्वीच दार उघडून उडी मारल्यामुळे तो थोडक्यात बचावला. गाडीच्या मागील आसनावर बसलेल्या निराली शर्मा (वय 27), दामिनी प्रजापती (वय 28), जैवीनी राणा (वय 25), मेघा शालेकर (वय 28), आणि अंतिमा शर्मा (वय 25) या पाचही तरुणी गंभीर जखमी झाल्या. सर्व जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0