Lalbaugcha Raja: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने निवेदनाद्वारे गणेश भक्तांसह प्रशासन, शासन यांच्या मानले आभार
मुंबई :- लालबागचा राजा Lalbaugcha Raja सार्वजनिक गणेश मंडळाने एक निवेदन जारी करत सर्वांचे आभार व्यक्त केले पोलीस आयुक्त मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्यासह गणेश भक्त आणि सर्वांचे लालबागचा राजा सार्वजनिक मित्र मंडळाने जाहीर निवेदन करत आभार व्यक्त केले आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने यंदाही लालबागच्या राजाचा 91वा गणेशोत्सव शनिवार 7 सप्टेंबर ते मंगळवार 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत मोठ्या जल्लोषात-उत्साहात आणि मांगल्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. Mumbai Latest News
हा उत्सव निर्विघ्नपणे संपन्न करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सहकार्य करणारे मुंबई पोलीस प्रशासनातील मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त
सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) अनिल पारस्कर, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-4) प्रशांत कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त कुमुद कदम, काळाचौकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक लांडगे तसेच काळाचौकी पोलीस स्टेशन, भायखळा पोलीस स्टेशन, आग्रीपाडा पोलीस स्टेशन, नागपाडा पोलीस स्टेशन, व्ही.पी. मार्ग पोलीस स्टेशन, दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे आणि सर्व कर्मचारी बंधू-भगिनींचे मन:पूर्वक जाहीर आभार !
त्याबरोबरच बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त अमित सैनी, उपायुक्त प्रशांत सपकाळे, एफ साऊथ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक अभियंता प्रशांत बने, तसेच महापालिका प्रशासनातील सर्वच कर्मचारी बंधू-भगिनींचे मन:पूर्वक जाहीर आभार!
त्याचप्रमाणे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणारे सर्व भाविक तसेच विसर्जन मार्गावरील सर्व भाविक आणि विभागातील सर्व रहिवाशी, वर्गणीदार-देणगीदार, व्यापारीवर्ग, कोळी महिला, हितचिंतक, राज्य प्रशासन, विभागातील मंडळे, सामाजिक संस्था, प्रिंट व डिजिटल माध्यमे व त्यांचे प्रतिनिधी आणि समस्त नागरिकांचे मन:पूर्वक जाहीर आभार मानले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…