Lalbaugcha Mumbai Accident News : पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक केली; गुन्हा दाखल ,गणेश विसर्जनाच्या लगबगीत घडली दुर्दैवी घटना; एक मुलगाही जखमी
मुंबई :- गणेश विसर्जनाच्या लगबगीत मुंबईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झोपलेल्या दोन चिमुरड्यांना एका ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचा 11 वर्षीय भाऊ जखमी झाला. अपघात घडवून ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र काळाचौकी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. Lalbaugcha Mumbai Accident News
नेमकं काय घडलं?
शनिवार, 6 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास, लालबाग परिसरात साफसफाईचे काम करणारी सुमन वजनदार ही महिला आपली दोन मुले चंदा (वय 2) आणि शैलेश (वय 11) यांच्यासह लालबाग राजाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर झोपली होती. त्याचवेळी एका अज्ञात भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली.
अपघातात चंदा आणि शैलेश दोघेही गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने त्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्या चंद्राचा मृत्यू झाला, तर शैलेशवर उपचार सुरू आहेत. अपघात घडवून ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
सीसीटीव्हीच्या मदतीने अटक
काळाचौकी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे पोलिसांनी फरार ट्रकचालक संतोष गुप्ता (वय 27) याला शोधून काढले आणि अटक केली. तो घाटकोपरमध्ये राहणारा आहे. त्याच्याविरोधात मोटार वाहतूक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…
•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…
Sanjay Raut On MVA : राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआची रणनीती | 'मुंडवा जमीन घोटाळा' अद्याप…