मुंबई

‘लाडकी सून योजना’ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात योजनेचा शुभारंभ; महिलांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी

Ladki Sunbai Yojana : पीडित सुनांना तात्काळ मदत, तर चांगल्या सासूंचा सन्मान; शिवसेना स्टाईलने होणार अन्यायग्रस्तांना न्याय

मुंबई :- राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एक धाडसी पाऊल उचलले आहे. ‘लाडकी बहीण योजने’च्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना’ सुरू करण्यात आली असून, ज्या सुनांना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जातो, त्यांना या योजनेतून तात्काळ मदत दिली जाणार आहे. Ladki Sunbai Yojana ठाण्यात नुकताच या योजनेचा भव्य शुभारंभ झाला.

या योजनेचा मुख्य उद्देश प्रत्येक घरात सुनेला मुलीप्रमाणे सन्मान मिळावा हा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले की, “जशी आपली मुलगी असते, तशीच सूनही असते. तिलाही सन्मानाने वागवले पाहिजे. अनेक घरांमध्ये सुनांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही ही योजना सुरू केली आहे.” या मोहिमेअंतर्गत, घरगुती हिंसाचाराचा सामना करणाऱ्या महिलांसाठी ८८२८८६२२८८ हा विशेष हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.

हेल्पलाईनवर तातडीने मिळणार मदत

पीडित महिलांनी न घाबरता या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. सुरुवातीला समुपदेशनाद्वारे कुटुंबात समेट घडवण्याचा प्रयत्न केला जाईल, पण जर ही पद्धत अयशस्वी ठरली, तर ‘आपली शिवसेना स्टाईल आहेच’ असे म्हणत योग्य कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, या योजनेत केवळ अन्यायग्रस्त सुनांनाच मदत केली जाणार नाही, तर चांगल्या सासूंचाही सन्मान केला जाईल, जेणेकरून समाजात सकारात्मकता पसरेल.

या योजनेची राज्यस्तरावरची जबाबदारी राज्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ही मोहीम राज्यभर राबवली जाणार असून, प्रत्येक शिवसेना शाखा आणि कार्यालये यामध्ये सहभागी होऊन पीडित महिलांना मदत करतील.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago