Ladki Bhain Yojana : विधवा, घटस्फोटीत आणि एकल महिलांसाठी विशेष सुविधा; 31 डिसेंबरपर्यंत कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
मुंबई :- राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्यामुळे अनेक विधवा, निराधार आणि एकल महिलांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र, या महिलांच्या मागणीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने आता विशेष सुविधा सुरू केली आहे.
ई-केवायसी आणि नवीन नियम
योजनेतील अपात्र महिलांना वगळण्यासाठी आणि गरजू महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. याची मुदत 31 डिसेंबर पर्यंत आहे. ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते.
ज्या लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत, पती हयात नाहीत, किंवा ज्यांचा पतीसोबत घटस्फोट झाला आहे, अशा महिलांना ई-केवायसी पूर्ण करताना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने अडचणी येत होत्या. आता शासनाने या महिलांसाठी खालील पर्यायी उपाय जाहीर केले आहेत:
आवश्यक कागदपत्रे: संबंधित लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी पूर्ण करून, पती अथवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र अथवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे 31 डिसेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे.
पुढील प्रक्रिया: अंगणवाडी सेविका या प्रमाणपत्रांची तपासणी करून, त्या महिलांना पती/वडिलांच्या ई-केवायसीमधून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे पाठवतील. त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आयुक्तांमार्फत शासनाकडे शिफारस करतील.
या निर्णयामुळे अनेक गरजू, विधवा, निराधार आणि एकल महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. महिला व बालविकास अधिकारी आनंद खंडागळे यांनी संबंधित लाभार्थ्यांना तातडीने कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…