Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारचा नवीन निर्णय; 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
•राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवीन निर्णय जाहीर केला असून मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मुंबई :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या वार्षिक अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर करण्यात आली. अवघ्या काही काळातच ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली. 2 कोटीहुन अधिक महिलांनी या योजनेचे अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवीन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. याबाबत जीआर काढण्यात आला असून महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर तो शेअर केला आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी शासन निर्णय जाहीर करत महिला वर्गाला अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज दाखल करण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढ दिली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करता येणार आहे. अदिती तटकरे यांनी पोस्ट करताना लिहिले आहे की, “महिला सक्षमीकरणाची क्रांती यापुढेही सुरूच राहणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार. ज्या महिला भगिनींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केली नसेल त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी. बदलाचे साक्षीदार नव्हे.. शिल्पकार व्हा… मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी व्हा !” अशी पोस्ट मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा राहिला आहे तर महिला वर्गाला सप्टेंबर महिन्यामध्ये देखील भरता येणार आहे.