महाराष्ट्र
Trending

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा हप्ता रखडला!

Ladki Bahin Yojana 13th Installment : दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ अजूनही खात्यावर नाही,पात्र बहिणींची यादी अंतिम टप्प्यात; अधिकाऱ्यांकडून दिलासा

मुंबई :- राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला जून महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या वर्षातील पहिला हप्ता अजूनही लाभार्थिनींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. योजनेचे पहिले 12 हप्ते वेळेवर देण्यात आले होते. Ladki Bahin Yojana 13th Installmen मात्र जुलै 2025 साठीचा लाभ रखडला असून तो महिनाअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिळेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे राज्यातील लाखो महिलांसाठी एक प्रकारचे मासिक आधार ठरले आहे. जुलैपासून दुसऱ्या वर्षाला सुरुवात झाली असून, पहिला हप्ता देण्याबाबत तांत्रिक व प्रशासनिक प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.

गेल्या वर्षी सुरुवातीला 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ देण्यात आला होता. त्यानंतर निकषांनुसार केलेल्या छाननीनंतर सुमारे 10 लाख बहिणींना अपात्र ठरवण्यात आले आहे. सध्याची लाभार्थी संख्या 2 कोटी 47 लाखांवर स्थिरावली असून, अंतिम पात्र यादी तयार करण्याचे काम महिला व बालकल्याण विभागाकडून सुरू आहे.

कधी मिळणार हप्ता?

विलंबाबाबत प्रशासनाने स्पष्ट केले की, बँक प्रक्रियेतील विलंब, लाभार्थी पडताळणी आणि डेटा संकलन यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. तथापि, लाडक्या बहिणींना हा हप्ता जुलैअखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत निश्चित मिळेल, असा दिलासा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0