मुंबईठाणे
Trending

Ladki Bhain Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आजपासून जमा होणार; ‘ई-केवायसी’साठी दोन महिन्यांची मुदत

Aditi Tatkare On Ladki Bhain Yojana : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा: तांत्रिक अडचणी दूर करून शुक्रवारपासून निधी वितरण सुरू

अलिबाग :- ‘लाडकी बहीण’ योजनेच्या Ladki Bhain Yojana लाभार्थी महिलांसाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याच्या लाभाचे वितरण आजपासून (शुक्रवार) सुरू होणार असून, ही रक्कम येत्या 2 ते 3 दिवसांत जमा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दिवाळीपूर्वी निधी वितरणाचे प्रयत्न यशस्वी

लाभार्थी महिलांना दिवाळीपूर्वी सन्मान निधी देता यावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील होते. नुकताच सामाजिक न्याय विभागाकडील 410.30 कोटींचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वळवण्यात आला होता. हा निधी प्राप्त होताच, तातडीने निधी वितरण सुरू करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाला देण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारपासून लाभार्थ्यांच्या खात्यात निधीचे वितरण सुरू होणार असून, जवळपास दोन कोटी महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

ई-केवायसी न केलेल्यांना दोन महिन्यांची मुदत

मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी एक महत्त्वाचा इशाराही दिला आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी पुढील दोन महिन्यांत (60 दिवसांत) ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू केली आहे.

या प्रक्रियेत आधार नंबर टाकल्यानंतर ओटीपी जात नसल्याच्या तांत्रिक अडचणी होत्या. पण आता त्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरू असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

या महिलांचे लाभ थांबवले

योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांची निरंतरपणे पडताळणी केली जात आहे, ज्यात अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचे लाभ थांबवण्यात आले आहेत.

वयाची अट: आधार कार्डप्रमाणे 21 वर्षांपेक्षा कमी अथवा 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे.

कुटुंबातील मर्यादा: रेशन कार्डनुसार ज्या कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत आहे, अशा कुटुंबातील महिलांचाही समावेश अपात्र ठरलेल्यांमध्ये आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0