मुंबई

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी 410 कोटींचा निधी वळता; SC/नवबौद्ध महिलांसाठी वापरण्याच्या स्पष्ट सूचना

•सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वाचा निर्णय; निधी वितरणाचे नियम निश्चित

मुंबई :- राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठी पाऊल उचलले आहे. या योजनेसाठी विभागांतर्गत येणाऱ्या 410.30 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळता करण्यात आला आहे.

सामाजिक न्याय विभागाने या निधीसंदर्भात बुधवारी शासन निर्णय (GR) जाहीर केला आहे. या निर्णयानुसार, महिला व बालविकास विभागाने हा निधी केवळ अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठीच वापरण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत.

निधी वितरण आणि नियम

नियतव्यय: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाने एकूण 3960 कोटी इतका नियतव्यय मंजूर केला आहे.

सप्टेंबरचा हप्ता: वित्त विभागाने ठरवून दिलेल्या कार्यप्रणालीनुसार, सप्टेंबर महिन्यातील पात्र महिलांना हप्ता देण्यासाठी सहायक अनुदानामधून 410.30 कोटी इतका निधी महिला व बालविकास कल्याण विभागाला बुधवारी मंजूर करण्यात आला.

दुहेरी लाभावर निर्बंध

या निधीला मंजुरी देताना सामाजिक न्याय विभागाने एक महत्त्वपूर्ण सूचना केली आहे: संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता मिळणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली आहे. म्हणजेच, विभागांतर्गत अन्य शासकीय निवृत्तिवेतन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार नाही.

या शासन निर्णयामुळे आता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण लवकरात लवकर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

16 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

16 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

21 hours ago