मुंबई
Trending

Kunal Patil : काँग्रेसला धक्का, कुणाल पाटील भाजपमध्ये सामील

Kunal Patil Joined BJP : “विकासासाठी निर्णय घेतला”, भाजपात सामील होताना पाटील यांची प्रतिक्रिया

मुंबई | धुळे जिल्ह्यात काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे कुणाल पाटील यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. Kunal Patil Joined BJP मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, जयकुमार गोरे आणि जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत त्यांनी ‘कमळ’ हाती घेतले.

पाटील यांनी काँग्रेसचा सात दशकांचा परिवार व पक्षाशी असलेली नाळ तोडत भाजपमध्ये प्रवेश केला. स्वतःच्या पक्षांतराबाबत बोलताना ते म्हणाले, “माझ्या रक्तात काँग्रेस आहे, पण माझ्या मतदारसंघाचा विकास थांबू नये यासाठी हा निर्णय घेतला.”

कुणाल पाटील हे धुळे जिल्ह्यातील एक प्रभावी नेते मानले जातात. 2014 व 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. पाटील यांचे आजोबा चुडामण अण्णा हे पंडित नेहरूंच्या लाटेतही लोकसभेवर निवडून आले होते. वडील आंबादास पाटील यांनीही सात वेळा आमदारकी भूषवली. या तीन पिढ्यांचा काँग्रेसशी असलेला संबंध आज संपुष्टात आला.

गेल्या काही दिवसांपासून पाटील भाजपच्या संपर्कात होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याची चर्चा होती. आज त्यांच्या पक्षप्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

धुळेकरांनी दक्षिण मुंबईत ताकद दाखवली आहे. आमचं हे पाऊल पक्षांतर नाही, तर जनतेच्या विकासासाठी घेतलेलं पाऊल आहे,” असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांनाही शांततेने निर्णय स्वीकारण्याचं आवाहन केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0