मुंबई
Trending

Kunal Kamra : “हम होंगे कामयाब”… पण हातात होते माईकऐवजी मुष्ट्या! विधानभवनातील हाणामारीवर कुणाल कामराची कॉमिक टोलेबाजी

Kunal Kamra Latest Tweet On Vidhan Sabha Clash : गद्दार’, ‘कायदा मोडणारे’ म्हणत हास्याचं हत्यार; नेत्यांनी घेतली जबाबदारी, मागितली माफी

मुंबई | महाराष्ट्र विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुरुवारी झालेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांतील जोरदार हाणामारीने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असतानाच, यावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया देत हास्याचं हत्यार उगारलं.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कामराच्या व्हिडीओमध्ये, ‘हम होंगे कामयाब’ या गाण्याच्या पार्श्वभूमीवर हाणामारीचा व्हिडीओ जोडण्यात आला आहे. व्हिडीओला “कायदा मोडणारे” असे कटाक्ष कॅप्शन देत विधानसभेतील अनागोंदी कारभारावर कामराने उपरोधिक निशाणा साधला आहे.

कॉमेडी, टीका आणि राजकीय स्फोट

या व्हिडीओमध्ये वापरलेले गाणे कामराच्याच एका जुन्या स्टँडअप शोमधील आहे. याआधीही त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ असे संबोधत विडंबन केल्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा रोष पत्करावा लागला होता. मात्र, विधानभवनातच घडलेल्या या राजकीय तमाश्यावर पुन्हा एकदा कामराने आपला व्यंगबाण सोडला आहे.

राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया, माफी आणि निषेध
या हाणामारीवर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ती दुर्दैवी असल्याचे सांगून माफी मागितली. “घडलेल्या प्रकाराबद्दल मला खरोखरच दुःख आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी हाणामारीवेळी धमक्या आणि शिवीगाळही झाल्याचा आरोप केला आहे. तर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर थेट टीका करत म्हटले, “जर गुंड विधानसभेत पोहोचत असतील, तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी.”

काँग्रेस नेते नाना पटोले यांनीदेखील या घटनेचा तीव्र निषेध करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0