Krantijyot Foundation Panvel : क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे ‘थर्टी फर्स्ट ‘ उपक्रम सालाबादप्रमाणे राबवण्यात फॉउंडेशन यशस्वी..
पनवेल महाराष्ट्र मिरर : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक हौशींकडून जल्लोष केला जातो. यात पार्टी करून मद्यपान केले जाते. यातून काही जण नशेत वाहन चालवितात. परिणामी अपघात होतात. तसेच भर रस्त्यात किंवा वर्दळीच्या ठिकाणी काही अतिउत्साही असलेल्यांकडून वादाचे प्रकार होऊन काही गुन्हे होतात. त्यासाठी पोलिसांकडून ३१ डिसेंबरला सायंकाळपासूनच मोठा बंदोबस्त करण्यात आलं ते पहाटे पर्यंत, त्यामुळे अशा मद्यपी तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांची कोठडीत रवानगी होऊ नये यासाठी पनवेल शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे सालाबादप्रमाणे या ही वर्षी देखील “थर्टी फर्स्ट “31 डिंसेबर रोजी क्रांतीज्योत महिला विकास फांउडेशनतर्फे पनवेल krantijyot foundation Panvel येथील आदई सर्कल सुखापूर नविन पनवेल ह्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात आला .शासन नियमांचे पालन करीत वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना , हेल्मेट घातलेले व सीट बेल्ट लावले आहेत त्यांना गुलाब पुष्प देऊन वाहतुक नियमांचे पालन करा, वाहने सावकाश चालवा असा जाणीवपुर्वक संदेश क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे देण्यात आला, जेणेकरून वाहन चालवताना अपघात होऊन दुर्घटना होणार नाही, जीवितहानी टळेल. तसेच आपले पोलीस बांधव -भगिनी थर्टी फस्टच्या दिवशी पहाटे पर्यंत ड्युटी करतात, त्यांच्याही भावनांचा आदर करून त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ त्यांनाही फाउंडेशनच्या वतीने गुलाबपुष्प देण्यात आले. फाउंडेशन मधील सर्व महिलांनी हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
तसेच या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी कौतुक केले सह परिमंडळ ०२, पनवेलचे सहा. पोलीस आयुक्त .अशोक राजपुत,ह्यांनी कार्यक्रमास भेट देत ह्या कार्यक्रमाचे कौतुक केले पोलीस आपले कर्तव्य चोख बजावतात म्हणून यादिवशी आमचा सन्मान करणारी क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन ही एकमेव सामाजिक संस्था आमच्या निदर्शनास आली असे उदगार देखील,सहा. पोलीस आयुक्त ,अशोक राजपुत, व वाहतूक वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील व काही अधिकाऱ्यांनी यावेळी काढले. या उपक्रमात पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी, नवीन पनवेल वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ . रुपालिताई शिंदे ,श्री स्नेहा धुमाळ सदस्या सौ .राखी कदम,सदस्या कु. कांचन विशेष आभार वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी मा. श्री. संजय पाटील वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी, पोलिस महिला कर्मचारी आदी उपस्थित होते.