मुंबई

Kotak Neo App Fraud News : इन्स्टावर शेअर मार्केट गुंतवणुकीची जाहिरात; डोंबिवलीच्या एका व्यक्तीचे तब्बल 48.51 लाख लुटले!

•Kotak Neo ॲप डाऊनलोड करून लाखों रुपयाचा गंडा, मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

डोंबिवली :- डोंबिवली मधील निळजे गाव परिसरात राहणाऱ्या स्वप्निल सुभाष शेवाळे (35 वर्ष) सायबर टोळ्यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणूक करून नफ्याचे प्रलोभन दाखवून तब्बल 48 लाख 51 हजार रुपयांचा गंडा घातला आहे. इंस्टाग्राम मध्ये जाहिरातीमुळे फसवणूक जाण्याची घटना मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे Kotak Neo ॲप डाऊनलोड करण्यास सांगून तब्बल 48 लाख 51 हजार रुपयाचे ॲप द्वारे फसवणूक झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निल शेवाळे हे instagram वर जाहिरात बघत असताना जाहिरातीमधील लिंक क्लिक केल्यावर त्यांना दोन व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी Kotak Neo हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर स्वप्निल शेवाळे यांना आयपीओ स्टॉक व ऑप्शन स्टॉक विकत घेण्यासाठी तब्बल 48 लाख 51 हजार रुपये ऑनलाईन भरण्यास सांगितले. तसेच या ॲपद्वारे मोठ्या प्रमाणात नफा मिळेल असेही अमिष दाखविले. परंतु जून ते ऑगस्ट दरम्यान गुंतवणूक केलेली रक्कम परत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (ड)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण हे करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0