पुणे
Trending

Kondhwa News | कोंढव्यात अनाधिकृत बांधकामांचा थैमान : मनपात ‘खाडे’ मारणारा अधिकारी ‘गुपचूप’?

  • पारगे नगर येथे कारवाई नावालाच : दुसऱ्या बांधकामांकडे डोळेझाक | Kondhwa News
  • अँटी करप्शन विभागाकडून चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता

पुणे, दि. २७ नोव्हेंबर, महाराष्ट्र मिरर
वि.रा. जगताप

Kondhwa News | जगभरात आयटी हब म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या पुणे शहराला अनाधिकृत बांधकामांचे गालबोट लागले आहे. विशेषतः उपनगरांमध्ये अनाधिकृत बांधकामांनी थैमान घातला आहे. यातही कोंढवा अनाधिकृत बांधकामे व बनावट कागदपत्रांसाठी कुप्रसिद्ध झाला आहे. गुंठा, दोन-तीन गुंठा जागेत ७ ते ९ मजल्याचे टॉवर राजरोसपणे थाटले जात आहेत. तर याकडे महापालिकेत ‘खाडे’ मारणारे अधिकारी ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत असल्याचे व अनाधिकृत बिल्डर लॉबीशी जवळीक साधत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. Kondhwa News

पारगे नगर येथे कारवाई पण …

नागरिकांच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर पुणे महापालिकेकडून दाखविण्यासाठी कारवाई करण्यात येत आहे. एका बांधकामावर कारवाई करून त्याच्या समोरील व बाजूस असलेल्या अनाधिकृत इमारतींना अभय देण्यात येत आहे. महापालिकेत ‘खाडे’ मारणाऱ्या अधिकाऱ्याकडून अनाधिकृत बिल्डर यांच्याशी जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. या कर्तबगार अधिकाऱ्याची अँटी करप्शन विभागाकडून चौकशी झाल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. Pune corporation

एनए दाखला बनावट ? कोट्यवधींचा महसूल ‘बुडाला’!

पारगे नगर येथे ७ मजली बांधकाम करताना बनावट एनए (अकृषिक दाखला) कागदपत्रे तयार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. तसेच ८३ क नोंद सातबारा दप्तरी असताना ती नोंद बनावट कागदपत्रांच्या आधारे कमी असल्याचे भासवून खरेदीखत नोंदविले गेले असल्याने कोट्यवधींचे शासकीय महसूल बुडाल्याची चर्चा आहे. Fake NA order, Pune news

कोंढव्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी खत ?

कोंढव्यातील अनाधिकृत बांधकामे खरेदी विक्री करताना मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे वापरली जात असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. बनावट कागदपत्रे तयार करून सदनिका खरेदीधारकांची फसवणूक करण्यात येत आहे. बनावट कागदपत्रामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. Fake Document

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0