- गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथक – २ कडून कारवाई
पुणे, दि. २७ सप्टेंबर, महाराष्ट्र मिरर
मुबारक जिनेरी
Kondhwa MD Drugs | पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या ड्रग्स फ्री पुणे संकल्पनेसाठी पुणे गुन्हे शाखा पोलिसांनी व्यापक कारवाया हाती घेतल्या आहेत. आज एका कारवाईत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा येथे वास्तव्यास असणाऱ्या दोन ड्रग्स तस्करांना बेड्या ठोकून तब्बल १४ लाख रुपयांचा एमडी जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखिल पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड Police Inspector Sudarshan Gaykwad व पथकाने केली आहे.
याप्रकरणी संशयित जहीर ऊर्फ साद गनी खान, वय २० वर्षे व आदनान शाबीर शेख, वय २५ वर्षे, दोन्ही रा. कोंढवा, यांना ताब्यात घेण्यात आले आहे. Kondhwa MD Drugs
आज दि.२७ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच पथक पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार अझिम शेख यांना मिळालेले बातमीनुसार ११/३५ चा ओपेल फलक सोसायटी समोर, मलीक नगर, कोंढवा, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १) जहीर ऊर्फ साद गनी खान, वय २० वर्षे, २) आदनान शाबीर शेख, वय २५ वर्षे, दोन्ही रा. कोंढवा, पुणे यांच्या ताब्यातुन एकुण १४,००,०००/- रु. कि.चा ६३ ग्रॅम मॅफेड्रोन (एम.डी) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार अझिम शेख, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदिप शेळके, योगेश मांढरे, अझिम शेख, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, आझाद पाटील यांनी केली आहे.