
- अनाधिकृत बांधकामाबाबत ५ तक्रारी असताना देखील कारवाई ‘नावालाच’
- एमआरटीपी कारवाई झाली असताना देखील बांधकाम पूर्ण करून बेकायदेशीर व्यवहार
- फौजदारी गुन्हा नोंदवला मात्र ‘निझाम’ खुलेआम
पुणे, दि. १२ फेब्रुवारी, महाराष्ट्र मिरर Pune Corporation
Kondhwa | कोंढवा येथील अनाधिकृत बांधकामाचा बादशाह ‘निझाम’ समोर पुणे महानगरपालिका ‘नतमस्तक’ झाल्याने अनाधिकृत बांधकाम करणाऱ्याचे मनोधेर्य उंचालवे आहे. मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी कोंढव्यात कारवाईचा आव आणून ‘निझाम’शाहीला शरण गेल्याचे दिसत आहे. मनपाकडे तब्बल ५ तक्रारी नोंदवूनही कारवाई होत नसल्याने बांधकाम निरीक्षक यांची भूमिका संशयास्पद झाली आहे. याबाबत अँटी करप्शन विभागाने लक्ष दिल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. Kondhwa News


कोंढव्यातील पारगे नगर येथील अनाधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. बेकायदेशीर बांधकामाकडे पुणे महापालिका बघ्याची भूमिका घेऊन पाहत असल्याने ‘अर्थ’पूर्ण व्यवहार चर्चेत येत आहे. पुणे मनपाकडून एमआरटीपीची कारवाई झाली असताना देखील इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आल्याने पालिका प्रशासनाविषयी शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. बनावट जामीन प्रकरणाचा पर्दाफाश करणारे पोलीस बनावट कागदपत्र रॅकेटचे धागेदोरे उघड्यावर आणतील का ? याबाबत चर्चा आहे. kondhwa fake documents

कोंढव्यातील पोकळे मळा पारगेनगर येथील सर्वे नंबर ३८/३/२ येथील बेकायदेशीर बांधकामाबाबत पुणे मनपाचे बांधकाम निरीक्षक मयूर इंगळे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यावरून गुरंन. १००१/२४ आरोपी १. अलीम अब्दुल शेख २. मोहतशीम जुनेद शेख व ३. निजाम शेख यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६- ५२,४३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. kondhwa fake documents

कोट्यवधींचा महसूल बुडवून जागेची खरेदी विक्री ?
कोंढवा खुर्द पारगे नगर येथील सर्वे नंबर ३८/३/२ हि जागा महसूल अधिनियम ६३ अन्वये अहस्तांतरणीय आहे. जागा खरेदी करताना नियमाप्रमाणे महसूल भरणा करून ना हरकत प्रमाणपत्र घेणे क्रम प्राप्त आहे. परंतु कोट्यवधींचा महसूल न भरताच सदर जागेची बनावट कागदपत्रे जोडून विक्री झाल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.