पुणे, दि. ४ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Kondhwa Gang Rape
Kondhwa Gang Rape | कोंढवा हद्दीतील बोपदेव घाट परिसरात एका तरुणीचे अपहरण करून तिचा गँगरेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या गँगरेप वरून कोंढव्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. पुण्यात महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशातच आता अपहरण गँगरेप सारखा धक्कादायक प्रकार घडल्याने कायदा सुव्यवस्था मोडकीस आल्याचे दिसते.
गँगरेप करणाऱ्या संशयित आरोपींचे स्केच पोलिसांनी तयार केले असून याबाबत माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मित्राबरोबर फिरायला गेलेल्या २० वर्षीय तरुणीचे तिघांनी मानव अधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे भासवून अपहरण केले यानंतर तिघा नराधमांनी तिच्यावर गँगरेप केला. सदर धक्कादायक प्रकार आज पहाटे उघडकीस आला. तक्रार दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जमाव पोलीस ठाण्याच्या बाहेर जमला होता.
सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा Jt.CP. Ranjankumar Sharma यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत माहिती देताना सांगितले कि, बोपदेव घाटात तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला आहे. पहाटे पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी १० पथके रवाना करण्यात आली आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…