Kondhwa Crime News | पिसोळी पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले दरोडेखोर कोंढवा पोलिसांकडून जेरबंद
पुणे, दि. ७ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Kondhwa Crime News
Kondhwa Crime News गणेश चतुर्थीला पिसोळी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल दरोडेखोरांना कोंढवा पोलिसांनी वेळीच जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पुणे पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांना मोठे यश आले आहे. सदर धडाकेबाज कारवाई परिमंडळ-५ उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा वपोनि विनय पाटणकर व तपास पथकाने केली.
याप्रकरणी टोळीचा म्होरक्या अविनाश धनाजी शिंदे (वय ३२, रा. येवलेवाडी), रोहित राजु चौधरी (वय २४, रा. येवलेवाडी), आकाश किशोर चौधरी (वय २९, रा. होळकरवाडी, शेवाळवाडी), विशााल किशोर चौधरी (वय २७, रा. येवलेवाडी), अभिजित किशोर चौधरी (वय २३, रा. देवाची ऊरुळी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पकडण्यात आलेले आरोपी अट्टल दरोडेखोर आहेत.
म्होरक्या अविनाश शिंदे याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, दरोड्याची तयारी असे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांवरही खूनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune Police
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथक गुरुवारी रात्री गस्त घालत असताना पिसोळी येथील धर्मावत पेट्रोलपंपामागे काही गुन्हेगार एकत्र जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीवरून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशान्वये वपोनि विनय पाटणकर यांनी तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत दरोडेखोरांकडून लोखंडी तलवार, मिरची पुड, दोन मोटारसायकली असा ९१ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक डिगोळे तपास करीत आहेत.