क्राईम न्यूजमुंबई

Kondhwa Police News : कोंढवा : जॉय रायडिंगसाठी तब्बल 9 दुचाकी चोरणाऱ्या दोघांना बेड्या : वपोनि विनय पाटणकर यांची धडाकेबाज कामगिरी

Kondhwa Police Arrested Bike Thief : दोन आरोपींना ताब्यात, एक बाल आरोपी चोरीमध्ये समावेश 9 गुन्हे उघड

पुणे :- जॉय रायडींगसाठी गेल्या काही दिवसांपासून बाईक चोरी Bike Thief करणारी टोळी पुण्यात सक्रिय होती. या टोळीच्या मुसक्या अखेर आवळण्यात आल्या आहेत. पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या Kondhwa Police Station गुन्हे शोध पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. पुणे जिल्हयामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय. पोलिसांनी 09 मोटरसायकल जप्त केल्या असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दोन आरोपी मध्ये एक आरोपी या बाल गुन्हेगार असून पोलिसांनी एकूण 09 गुन्हे उघडकीस आणले आहे.एकूण 9 मोटारसायकलींसह 3 लाख 60 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. Pune Police Latest News

पोलिसांनी सांगितले की,कोंढवा पोलीस ठाणे Kondhwa Police Station हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्हयाचे उकल करण्याचे अनुषंगाने पेट्रोलिंग करुन सीसीटिव्ही फुटेज चेक करुन चोरीची वाहनाचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील, यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होत्या.तपास पथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, व त्यांचे पथक पेट्रोलींग करील असताना पोलीस अंमलदार राहुल थोरात, सुहास मोरे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन व्यक्ती हे खडी मशीन चौक ते उंन्ड्री चौक दरम्यान असणा-या धमार्वत पेट्रोल पंपाच्या गल्लीत काळे व निळे रंगाची पेंशन प्लस मोटार सायकल घेवुन उभे असुन त्याच्याकडील मोटार सायकलला नंबर प्लेट नाही. मोटार सायकल चोरीची असल्याबाबत संशय आहे. कोंढवा पोलीस ठाणे पोलिसांनी दोन व्यक्तींना त्याच्याकडील बंद पडलेली विना नंबर प्लेट मोटार सायकल चालु करित होते. तेव्हा त्याच्याकडे असणारी चोरीची असल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आकाश दीपक धनवटे (19 वर्ष,रा. हवेली, पुणे) तर दुसरा आरोपी हा बाल गुन्हेगार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींनी चोरी केलेल्या मोटरसायकल जप्त करून एकूण 09 गुन्हे उघडकीस आणले आहे. त्यांच्या विरोधात विमान नगर पोलीस ठाणे-03, कोंढवा पोलीस ठाणे-04, वारजे माळवाडी पोलीस ठाणे-01, लोणीकंद पोलीस ठाणे-01 असे एकूण 09 गुन्हे उघडकीस आणले आहे. तसेच पोलिसांनी तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. Pune Police Latest News

पोलीस पथक

अमितेशकुमार साो पोलीस आयुक्त, Pune CP Amitesh Kumar रंजन शर्मा सह पोलीस आयुक्त, मनोज पाटील, पुर्वे प्रादेशिक विभाग, आर. राजा, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 05, धंन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, अंमलदार अमोल हिरवे, सुहास गोरे, राहुल थोरात, अभिजीत जाधव, राहुल रासगे, गणेश चिचकर, अभिजीत रत्नपारखी, विकास मरगळे, मयुर मोरे, अक्षय शेंडगे, अनिल बनकर यांनी केली आहे. Pune Police Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0