महाराष्ट्र
Trending

Kolhapur Politics : शेतकरी संघटना आक्रमक; कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

Kolhapur Politics News

Farmers Show Black Falg CM Eknath Shinde : पोकळ वल्गना नको, कारखानदारांना पाठीशी घालू नका

कोल्हापूर :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. हातकणंगले तालुक्यातील कोरोची या गावामध्ये महिला सशक्तीकरण या कार्यक्रमाबरोबर ते जिल्ह्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत. Kolhapur Politics News

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली. गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन 100 रुपये देण्याच्या मागणीवरून काळे झेंडे Black Flag दाखवण्यात आले. Kolhapur Politics News

राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्याने कारखान्यांना दुसरा हप्ता देणे अडचणीचे झाले आहे. जवळपास 3 महिने झाले तरीही शासनाने निर्णय न घेता सरकार कारखानदारांच्या पाठिशी राहिल्याने संतापलेल्या संघटनेच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनार्थ डिजीटल बोर्ड तयार केला होता. या बोर्डवर 100 रूपयाचा दुसरा हप्ता बुडवून , एफ. आर पी चे तुकडे करून शेतक-यांच्या मुलांच्या हातात पेन नाही दगड घ्यायला लावणारे सरकार , मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका ,कारखानदारांना पाठीशी घालू नका.ठरल्याप्रमाणे गत हंगामातील दुसरा हप्ता 100 रूपये तातडीने द्या अशा आशयाचे फलक दाखविण्यात आले. Kolhapur Politics News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0