कोल्हापूर

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये चमकला शिक्षकांचा तारा : निलम जगताप यांना 2025 चा राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार!

•निलम राजेंद्र जगताप यांना 2025 चा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान ; सुप्रसिद्ध कवी रोहित शिंगे, अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि दीपक चामे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला

कोल्हापूर :- शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र शिक्षक पॅनल कडून दिला जाणारा “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार” यावर्षी कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या भव्य समारंभात राज्यभरातील 150 पेक्षा अधिक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यापैकी प्रमुख ठरले पीसीएमसी स्कूल, कुदळवाडी येथील निलम राजेंद्र जगताप, ज्यांना 2025 साठी “आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला. नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी प्रियतेमुळे आणि उत्कृष्ट शिक्षणासाठी त्यांना सर्वत्र गौरव मिळतो.सध्या त्या पीसीएमसी स्कूल कुदळवाडी क्रमांक 89 येथे कार्यरत आहेत आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे तसेच विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियतेमुळे त्या ओळखल्या जातात.

कार्यक्रमाला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी रोहित शिंगे, ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि शिक्षक पॅनलचे अध्यक्ष दीपक चामे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन जितेन कदम यांनी केले.

पुरस्कार प्राप्त करताना निलम जगताप यांनी नमूद केले, “हा पुरस्कार फक्त माझा नाही, तर माझ्या कुटुंबाचा, सहकाऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा यशस्वी सहकार्याचा फळ आहे.”

शैक्षणिक क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मान, शिक्षणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago