Kolhapur Bribe News : कोल्हापूर शहर हादरवणाऱ्या धडाकेबाज कारवाईत अॅन्टी करप्शन ब्युरोने खाजगी वकील विनायक सुरेश तेजम (वय ३७) याला ₹२५,००० लाच स्वीकारताना थेट पकडले.
प्रकरण काय आहे?
Kolhapur : तक्रारदार यांच्या कोल्हापूर येथील मालमत्तेवरील सत्ता प्रकार कमी करण्याच्या प्रकरणात प्रांत कार्यालय, करवीर येथून आदेश काढून देण्यासाठी वकील तेजम याने “साहेबांना पैसे द्यावे लागतील” असा दम देत आधीच ₹१,६५,००० उचलले.
तरीही प्रकरणाचा अंतिम आदेश मिळवून देण्यासाठी त्याने आणखी ₹२५,००० लाचेची मागणी केली. Kholhapur Latest Bribe News
सापळा आणि रंगेहात पकड
तक्रारदाराने अॅन्टी करप्शन ब्युरोकडे धाव घेतली. पडताळणीत वकील तेजम याची मागणी खरी ठरली.
शाहुपुरीतील मंजुळा अपार्टमेंट परिसरात पंचासमक्ष तेजम याने तक्रारदाराकडून रोख २५ हजार स्वीकारताच पथकाने छापा टाकून त्याला जेरबंद केले.
गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू
आरोपी विनायक तेजम याच्याविरुद्ध शाहुपुरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाईतील पराक्रमी पथक
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. राजेंद्र सानप आणि त्यांच्या टीमने (सुधीर पाटील, सचिन पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील, प्रशांत दावणे) यशस्वी केली.
नागरिकांनो, आवाज उठा!
कोणताही सरकारी अधिकारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम जर लाच मागत असेल, तर लगेच संपर्क साधा:
टोल फ्री: 1800 222 021
हेल्पलाइन: 1064
व्हॉट्सअॅप: 7875333333
कोल्हापूर कार्यालय: 0231-2540989
संदेश स्पष्ट – लाच मागितल्यास गप्प बसू नका, थेट अॅन्टी करप्शनला कळवा!
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…