Kokan Special Train : कोकणरेल्वे हाउसफुल,गणेशोत्सवामुळे कोकणात रेल्वेने सोडल्या आणखी विशेष गाड्या
Kokan Special Train : गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 325 हून अधिक गाड्या दिल्या आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजन केले.
मुंबई :- गणेशोत्सवाच्या Ganesh Ustav 2024 दरम्यान मुंबईच्या चाकरमान्यांची Kokan Special Train गावाला जाण्याची ओढ लागते. कोकणात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो तसेच मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. गणेशोत्सवामुळे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर 325 हून अधिक गाड्या दिल्या आहेत. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजन केले. त्यानंतरही कोकणात येणाऱ्या सर्वच ट्रेन हाउसफुल झाल्या आहेत. सहा ते सात लाख लोक ट्रेनने कोकणात येणार आहेत. त्यामुळे रेल्वेने अजून पनवेल आणि मडगाव दरम्यान ,2 अतिरिक्त गणपती उत्सव विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मडगाव-पनवेल- मडगाव विशेष
- 01428 विशेष गाडी दि. 15.09.24 रोजी मडगाव येथून 9.30 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी 22.15 वाजता पोहोचेल.
- 01427 विशेष गाडी दि. 15.09.24 रोजी पनवेल येथून 23.45 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी 11.00 वाजता पोहोचेल.
गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. Kokan Special Train कोकण रेल्वेमार्गावर सोमवारी काही गणपती स्पेशल गाड्या साडेचार तास उशीराने धावत आहेत. तसेच नियमित धावणाऱ्या गाड्या दिड तास उशीराने धावता आहेत. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा खोळंबा होत आहे. कोकणकन्या, तुतारी, सावंतवाडी गणपती स्पेशल, सिंधुदूर्ग एक्सप्रेस गाड्या उशीराने धावत आहे.