महाराष्ट्र
Trending

Kokan Red Alert : कोकणात पावसाचा कहर! पालघर ‘रेड अलर्ट’वर, मुंबईसाठी ‘ऑरेंज’ इशारा

Maharashtra Weather News Update : ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांनाही इशारा; सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता

मुंबई | हवामान विभागाने कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला असून, पालघर जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’ तर मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील 24 ते 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार असून, सखल भागांत पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. Maharashtra Weather News Update

वाऱ्याच्या द्रोणीय स्थितीमुळे कोकण पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वाऱ्याचा वेगही अधिक असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, प्रशासन सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान खात्याने नागरिकांना गरज असल्यासच घराबाहेर पडावे, अशी सूचना दिली असून, स्थानिक यंत्रणांनीही खबरदारीचा इशारा दिला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0