मुंबई

Kishori Pednekar : माजी महापौर किशोरी पेडणेकरांचेच नाव दुबार!

Kishori Pednekar On EC : वरळीतील प्रभाग क्रमांक 199 मधील यादीत गोंधळ; “ही छपाईची चूक असेल, तर आयोगावर कारवाई का नको?” पेडणेकरांचा निवडणूक आयोगाला संतप्त सवाल!

मुंबई :- मुंबई महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या मतदार यादीतील दुबार नावांवरून मोठा राजकीय गदारोळ सुरू असतानाच, आता यादीतील गोंधळाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. वरळीतील प्रभाग क्रमांक 199 मध्ये सर्वाधिक दुबार मतदार आढळले असताना, या प्रभागाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर Kishori Pednekar यांचेच नाव दुबार असल्याचे समोर आले आहे.

वरळीत सर्वाधिक गोंधळ

20 नोव्हेंबर रोजी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 227 प्रभागांमध्ये तब्बल 11 लाख दुबार नावे असल्याचे या यादीतून आढळून आले आहे. यापैकी काही नावे दुबार, तिबार नव्हे, तर शंभर वेळा असल्याची गंभीर बाबही प्रशासनाने कबूल केली आहे.
विशेष म्हणजे, सर्वाधिक दुबार नावे ही वरळी प्रभादेवीतील प्रभागांमध्ये आढळली आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग असलेल्या क्रमांक 199 मध्येच सर्वाधिक 8 हजार 207 दुबार नावे आहेत. या यादीत किशोरी पेडणेकर यांचेही नाव दुबार मतदार म्हणून नोंदवले आहे. त्यामुळे आता पेडणेकर यांनाही फॉर्म भरून हमीपत्र द्यावे लागणार आहे.

पेडणेकरांचे आयोगाला आव्हान

आपलेच नाव दुबार आढळल्याने संतप्त झालेल्या किशोरी पेडणेकर यांनी थेट निवडणूक आयोगावर टीका केली.

“सगळेच मतदार जागरूक असतातच असे नाही. एखाद्या मतदाराने हा फॉर्म भरला नाही, तर त्याला मतदान करू देणार नाही, हे चुकीचे आहे.”

“माझे नाव दुबार असेल, तर आणखी कोणत्या प्रभागात माझे नाव आहे, ते दाखवा!” असे आव्हान त्यांनी दिले.
त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला, “मग ही छपाईची चूक असेल, तर निवडणूक आयोगावर कारवाई का करू नये?” हा गोंधळ जाणूनबुजून केला आहे का, असाही सवाल त्यांनी केला.

‘निवडणूक आयोगाची ढकलगाडी’

दुबार नावे असलेल्या मतदारांना हमीपत्र देण्यासाठी वाढीव दिवस देण्याची मागणी त्यांनी केली आहे. मतदार यादी नक्की ‘कुठे बसून बनवली?’ असा खोचक सवाल त्यांनी केला. मतचोरीच्या आरोपांवर राज्य निवडणूक आयोग जबाबदारी केंद्र निवडणूक आयोगावर ढकलत आहे, तर केंद्र आयोग राज्यावर. “निवडणूक आयोगाची ही ढकलगाडी सुरू आहे,” अशी टीका त्यांनी केली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago