मुंबई
Trending

Kiran Mane : नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मर्सिडीज कार बद्दल केलेल्या वक्तव्यावर, शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी खिल्ली उडवली

Kiran Mane On Uddhav Thackeray : मर्सिडीज माझ्या साताऱ्यातल्या घरी पोहोचल्याशिवाय पाणी पिणार नाही ; किरण माने

मुंबई :- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे Neelam Gorhe यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या बाबत एक धक्कादायक आरोप करत विधान केले होते. उद्धव ठाकरे दोन मर्सिडीज घेतल्याशिवाय मोठेपद देत नाही असा खळबळ जनक आरोप गोऱ्हे यांनी केला होता. यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हे यांना चांगलेच लक्ष करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी स्त्री असून आपण त्यांचा आदर करतो, त्याच्यावर काय बोलणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. तर खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी आपण चार वेळा विधान परिषदेवर आमदार म्हणून गेला तर आपण किती मर्सिडीज दिली हे दाखवावे असे म्हटले होते. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते आणि अभिनेते किरण माने यांनी खिल्ली उडवत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये जोपर्यंत मर्सिडीज देत नाही पाणीही पिणार नाही असे हास्यत्मक वक्तव्य करत नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेना नेते किरण माने काय म्हणाले आपल्या पोस्टमध्ये?

उद्धवसाहेब ठाकरे,जय महाराष्ट्र.
याठिकाणी हा सरासर अन्याय आहे.
एक शिवसैनिक या नात्यानं या ठिकाणी तुमच्याकडे मागणी करतो की तुमच्याकडे पडून असलेल्या हज्जारो मर्सिडीजांपैकी मला ही फोटोतली मर्सिडिज पायजे म्हणजे पायजेच याठिकाणी… मला कुठलंही पद नको.

ही मर्सिडीज माझ्या सातार्‍यातल्या घरी पोहोच झाल्याशिवाय मी पाणीही पिणार नाही हे याठिकाणी मी अण्णा हजारेंची शप्पथ घेऊन सांगतो.

‘अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलना’त विश्वविख्यात साहित्यिक विदुषी निलमताई गोर्‍हे यांची मुलाखत झाली. आता तिथे मुलाखत झाली म्हणजे त्या याठिकाणी कुणीतरी लै दर्जेदार खतरनाक लेखिका असणार असा माझ्या मनाचा समज झाला… पण फोटो पाहुन थोडी शंका आली. मग आमच्या शेतात रोजानं काम करणार्‍या एका पुस्तकवेड्या मजुराकडं चौकशी केली. तो खुप डोके खाजवून म्हणाला म्हणाला की बहुतेक मी यांच्या मराठी भयकथा आणि स्वप्नरंजक श्टोर्‍या वाचल्यासारखं वाटतंय. असो. ज्या पत्रकारानं त्यांची मुलाखत घेतली आहे, त्या पत्रकाराला पाहून तो म्हणाला हे चष्मा,मिशीवाले महाशयही याठिकाणी ‘स्पाॅन्सर्ड’ बनावट साहित्यात दिग्गज आहेत. मग ‘निलमजी साहित्यिक आहेत’ यावर माझा विश्वास बसला. इतका बसला, इतका बसला की जेवढा विश्वास याठिकाणी लाडक्या बहिणींचा एकनाथरावांवर आहे तितका बसला.

तर मुद्दा असा की, त्या म्हणाल्या “शिवसेनेत एक पद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना दोन मर्सिडिज द्याव्या लागतात.” उद्धवजी, मी चकित झालो ! माझ्या अंदाजाप्रमाणं विश्वविख्यात साहित्यिक निलमताईंना तुम्ही आमदारक्या, उपसभापतीपदं अमुक तमुक ढमुक अशी सहा मोठी पदं दिलेली आहेत. म्हणजे त्यांनी तुम्हाला टोटल एक डझन मर्सिडीझी दिलेल्या आहेत हे याठिकाणी सुर्यप्रकाशाइतक्या लख्खपणे सिद्ध होते !!!

किरण माने पुढे म्हणाले की,त्याचप्रमाणे तुम्ही रिक्षावाल्या, पानपट्टीवाल्या, भंगारवाल्या अशा दिग्गज व्यावसायिकांना आणि याठिकाणी अनेक सटरफटर फडतुसांना नगरसेवक, सभापती, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषद, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री केले आहे. याचे माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत. (अण्णा हजारेंची शप्पथ.) या न्यायानं मोजत बसलो तर तुमच्याकडं हजारो मर्सिडिज याठिकाणी धुळ खात पडून असणार यात शंका नाही !

त्यातली ही मर्सिडीज… माझ्या सुत्रांनुसार ही मर्सिडीज तुम्ही निलमताईंना तिन वेळा आमदार केल्यानंतर, दुसर्‍यांदा उपसभापती केलं तेव्हा दिलेल्या दोनपैकी एक आहे ! ती मला याठिकाणी आवडलेली असुन, मी याठिकाणी आग्रहाची मागणी करतो की मला शिवसेनेत कुठलंही पद न देता निलमताईंनी तुम्हाला दिलेली ती मर्सिडीज मला हवी आहे.

तरी याठिकाणी लवकरात लवकर ती मर्सिडीज सातारला माझ्या पत्त्यावर पोहोच करावी. एकंदरीत आत्ताची साहित्यसंमेलनातली ही तुफान विनोदाची हास्यजत्रा पहाता पुढच्या वर्षीच्या साहित्यसंमेलनात इमोशनल कथाकार रामदासजी कदम यांची मुलाखत कौशिकताई घेतील असा अंदाज माझ्या सुत्रांनी व्यक्त केला आहे. तो मराठी भाषेच्या पोस्टमार्टेमचा तुफान भयानक मनोरंजक कार्यक्रम पहायला मला या मर्सिडिजमधून जायचं आहे.

तेव्हा मला ही मर्सिडिज मिळावी ही विनंती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0