पनवेल : पनवेल महापालिकेच्या Panvel BMC वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा देण्याच्या उद्देशाने आज दिनांक १ऑक्टोबर रोजी खारघर मधील केंद्रीय विहार जवळील प्राईड ईमारतीच्या तळमजल्यावर मालमत्ता कर संकलन केंद्राचे उद्घाटन आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या हस्ते करण्यात आले. Panvel Latest News
यावेळी उपायुक्त बाबासाहेब राजळे, सहायक आयुक्त स्वरूप खारगे, प्रभाग अधिकारी स्मिता काळे, प्रभारी कर अधिक्षक सुनील भोईर, महेश गायकवाड, प्रभारी अधिक्षक जितेंद्र मढवी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मालमत्तांधारकांच्या बिलांमधील अडचणी लक्षात घेऊन, त्या सोडविण्यावरती महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने भर दिला आहे. नागरिकांना कर भरणे सोपे जावे, त्यांच्या मालमत्ता कराच्या बिलामध्ये दुरूस्ती व्हावी, तक्रारींचे निवारण लवकर व्हावे तसेच महापालिका मुख्यालयात येण्या जाण्याचा वेळ वाचावा या उद्देशाने हे मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. Panvel Latest News
मालमत्ता कर भरण्याची सुविधा यापूर्वी प्रभाग समितीमध्ये देण्यात येत होती परंतू नागरिकांना अधिक सोयीचे व्हावे यासाठी हे कर संकलन केंद्र सुरू केले आहे. भविष्यात याठिकाणाहून अधिकाधिक सुविधा देण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच दर शनिवारी महापालिकेस साप्ताहिक सुट्टी असली तरी देखील मालमत्ता कराचे धनादेश स्वीकारण्याची सुविधा महापालिका मुख्यालयात सुरू करण्यात आली आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी केले आहे. याचपध्दतीने आठवड्यातील कोणत्याही दिवशी धनादेशने कर भरणा करणाऱ्यांसाठी ड्रॉप बॉक्सची सुविधा महापालिकेच्यावतीने लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
नागरिकांना ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येत आहे. लवकरात लवकर नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी केले आहे. याबरोबरच ऑनलाईन कर भरणा केल्यास 2 टक्के सवलत देण्यात येत आहे. Panvel Latest News
पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकाधिक सक्षम होण्यावरती महापालिका भर देत आहे. हे मालमत्ता कर संकलन केंद्र सुरू झाल्याने खारघरवासियांना मालमत्ता कर भरणे सुकर होणार आहे. महापालिकेचा कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावा, पारदर्शक व्हावा, जबाबदार व्हावा यासाठी महापालिकेच्यावतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत.नागरिकांनी महापालिकेने दिलेल्या सोयी सुविधांचा लाभ घेऊन सहकार्य करावे.
आयुक्त श्री. मंगेश चितळे, पनवेल महानगरपालिका
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…