Kharghar News : खारघरमध्ये आयआयडीटी इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांच्या फॅशन ब्रँडचे शानदार लाँच
- विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पोशाखात अवतरल्या फॅशन जगतातल्या तारका
- फॅशन जगतातल्या मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तोंडभरून कौतुक
- फॅशन जगतात उत्तम व्यावसायिक तयार करण्याचा दृष्टीकोन- अफशा कपाडिया
पनवेल: खारघरमधील आयआयडीटी कॉलेजमधील Kharghar IIDT College विद्यार्थ्यांनी तयार केलेले मॉडर्न तसेच पारंपरिक ड्रेसेस आणि इंटेरियर डिजाइन्सचा फॅशन शो आणि फ्रेशर्स पार्टी शनिवारी (दि.२८ सप्टेंबर) खारघरमधील रॉयल ट्युलिप हॉटेलमध्ये संपन्न झाली. यावेळी मॉडेल्सने सर्व नवोदित ब्रँडचे ड्रेसेस उत्तमरीत्या रॅम्पवर सादर केले. फॅशन जगतातल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे तोंडभरून कौतुक फॅशन जगतात उद्योजक व व्यावसायिक तयार करण्याच्या दृष्टीकोनातून, आयआयडीटी कॉलेजमध्ये फॅशन डिझाइन कोर्स आणि इंटिरियर डिझाइन कोर्स करून विद्यार्थी आज आपल्या क्षेत्रात नाव कमावत आहेत. याच आयआयडीटी संस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना संधी देत विविध ड्रेसेस आणि इंटेरियर डिसाईन्सचे काही उत्कृष्ट नमुने तयार केले. त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या फॅशन ब्रँडचे शानदार लाँच यावेळी संपन्न झाले. Kharghar News
फॅशन जगतात उत्तम व्यावसायिक तयार करण्याचा दृष्टीकोन असून आयआयडीटी हे इन्स्टिटयूट विद्यार्थ्यांना फक्त फॅशन जगतातले ज्ञानच देत नाही तर त्यांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी देखील सर्वकाही करते, अशा शब्दात आयआयडीटी इस्न्टिट्यूटच्या डायरेक्टर अफशा कपाडिया सचदेव यांनी आपल्या संस्थेचे कौतुक केले. या नाविन्यपूर्ण कलाकृतींचे या क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या विविध मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.
या शानदार कार्यक्रमाला कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा शोचे निर्माता संजीव कुमार उर्फ एसके, मॉडेल आणि अभिनेत्री प्रिया सिंग, नम्रता चौहान, फॉरेव्हर प्रिटी ब्रॅण्डच्या डायरेक्टर नेस्टा शर्मा, इंटेरियर डिजायनर रेश्मा शेजपाल आणि भाविक शेजपाल यांच्यासह मान्यवर तसेच इंस्टिट्यूटचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. Kharghar News