क्राईम न्यूज
Trending

Kharadi Crime News | खराडीत अपहरण, लूटमार करणाऱ्या टोळीला बेड्या

  • चंदननगर वपोनि संजय चव्हाण व तपास पथकाची कामगिरी

पुणे, दि. ६ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर :
मुबारक जिनेरी

Kharadi Crime News | खराडी येथे लिफ्ट देण्याचा बहाणा करून दोघांचे अपहरण करून लूटमार केल्याप्रकरणी तिघांना जेरबंद करण्यात आले आहे. १५० सीसीटीव्ही फुटेजचे कोशल्यपूर्ण तांत्रिक विश्लेषण करून चंदननगर पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

संशयित आरोपी १) सुधीर महादेव माने यय २९ वर्षे, रा- महानगर बँकेच्या शेजारी, चंदननगर पुणे, २) आकाश अनिल लिमजे, वय ३१ वर्षे, रा- सातववस्ती खराडी पुणे, ३) मनोहर बाळासाहेब थोपटे, यय ३५ वर्षे, रा थिटेवस्ती खराडी पुणे यांना अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी कि, तक्रारदार प्रकाशचंद्र रतनलाल कुमावत, वय २३ वर्षे, रा- मालीखेडा, पोस्ट- गोगाथला, रेलमगरा राजस्थान हे त्यांच्या मित्रांसोबत खराडी येथे कामानिमित्त आले होते. कामकाज पूर्ण करून खराडी येथील आनंद हॉटेल समोर थांबलेले असताना, त्यांनी पुणे स्टेशनला जाणे करीता एक चारचाकी इटींगा गाडीला लिफ्ट मागीतली. गाडी थांबल्यानंतर फिर्यादी व त्याचा मित्र असे दोघे गाडीत बसले तेव्हा गाडीमध्ये अधीच दोन इसम बसलेले होते. त्यांनंतर पुढे दर्गा रोड खराडी या ठिकाणी गेल्यानंतर तेव्हा चालकाने गाडी पुढे दर्गा रोड खराडी पुणे या ठिकाणी नेल्यानंतर तेथे आणखी दोन इसम गाडीत बसले. त्यांनंतर त्यांनी गाडी फरिस्टपार्क दिशेने चळवुन लोहगावकडे निघाले तेव्हा जाताना यातील आरोपींनी तक्रारदार व त्यांचे मित्राला चाकुचा धाक दाखवुन आंळदी, चाकण या परिसरामध्ये नेवुन त्यांचेकडुन वेगवेळ्या एटीएम मधुन १,८०,०००/- रूपये काढुन घेवुन त्यांना रात्री चाकण परीसरात सोडुन दिल्याने त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशनला येवुन चंदननगर पोस्टे गु.र.नं ४६३/२०२४, बीएनएस कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्हयाचा तपास चंदननगर पोस्टे कडील तपास पथकातील अधिकारी पोलीस उप-निरीक्षक राहुल कोळपे व अंमलदार करत असताना चंदननगर व इतर परीसरातील एकुण १५० ते १८० सीसीटीव्ही चेक केले तसेच इतर तांत्रिक पद्धतीने पोलीसांनी कसोशिने तपास केला असताना दि.१८/०९/२०२४ रोजी चंदननगर पोस्टे कडील तपास पथकातील पोलीस अंमलदार विकास कदम व प्रफुल मोरे यांना त्यांचे बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमी वरून चंदननगर पोलीसांनी इसम नामे १) सुधीर महादेव माने यय २९ वर्षे, रा- महानगर बँकेच्या शेजारी, चंदननगर पुणे, २) आकाश अनिल लिमजे, वय ३१ वर्षे, रा- सातववस्ती खराडी पुणे, ३) मनोहर बाळासाहेब थोपटे, यय ३५ वर्षे, रा थिटेवस्ती खराडी पुणे यांना ताब्यात घेवुन पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हयाची कबुली दिली व त्यांनी सांगितले की आम्ही हे सर्व राहुल यदुवंशी, रा- हरियाना यांचे सांगणेप्रमाणे केले. त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली ५,००,०००/- रु किंमतीची मारूती सुझुकी इरटीगा गाडी नंबर एम.एच.१२.आरएफ. ११२० ही तसेच एक चाकु असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग- प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, तपास पथक प्रभारी अधिकारी सपोनि दत्तात्रय लिगाडे, पो, उप. निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार विश्वनाथ गोणे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे, शिवाजी धांडे, विकास कदम, प्रफुल मोरे, अमोल जाधव, नामदेव गडदरे, शेखर शिंदे, श्रीकात कोद्रे, सुरज जाधव, सचिन पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0