Eknath Khadse VS Girish Mahajan : जावयावरील आरोपांवरून खडसेंचा भाजपवर पलटवार; ‘विषारी पिल्लांना मोठं केल्याचं दुःख’
जळगाव :- माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा उफाळून आले आहे. Eknath Khadse VS Girish Mahajan राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खडसे यांच्या जावयावर गंभीर आरोप केल्यानंतर, खडसेंनी देखील भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. जळगावच्या जामनेरमध्ये भाजपने केलेल्या आंदोलनाला उत्तर देताना खडसे यांनी थेट महाजन यांनाच लक्ष्य केले आहे.
महाजनांच्या सिड्या प्रफुल लोढाकडे’
भाजपने केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले, “मला कशाला आंदोलन करून जोडे मारता, गिरीश महाजन यांना जोडे मारा. त्यांचे अनेक व्हिडिओ प्रफुल लोढाकडे आहेत.” यासोबतच, “मी एका पदाधिकाऱ्याला विचारले, तुम्ही आंदोलन का केले? तर तो म्हणाला, ‘वरून आदेश आहेत म्हणून’.” असे सांगत त्यांनी भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवली.
विषारी पिल्लांना मोठं केल्याचं दुःख’
खडसे यांनी यावेळी आपल्या जावयाचे समर्थन केले नाही, हे स्पष्ट केले. ते म्हणाले, “मी कधीही माझ्या जावयाचे समर्थन केले नाही. कुणाची एक तरी तक्रार आहे का? तरीदेखील रुपाली चाकणकर कोणत्या आधारावर बोलत आहेत?” यासोबतच, “काहीही झाले तरी मी प्रफुल लोढाचा विषय सोडणार नाही. फक्त हनी ट्रॅपवरून लक्ष विचलित करण्यासाठी मला बदनाम केले जात आहे.” अशी टीकाही त्यांनी केली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…