मुंबई
Ketaki Mategaonkar : पनवेलकरांच्या भेटीला मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर ….ओरायन मॉलचा आठवा वर्धापन दिन सोहळा
पनवेल– ओरायन मॉलच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर पनवेलकरांच्या भेटीला येत आहे.
रविवार दि.१९ मे २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता आपल्या वर्धापन दिनानिमित्ताने ओरायन मॉलने आयोजित केलेल्या समारंभासाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर उपस्थित राहणार असून वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या शॉप अँड विन या स्पर्धेतील विजेत्यांना ब्लू स्टोन तर्फे सोन्याचे दागिने तसेच लेकेअँम्प (Lekeamp) तर्फे ई बाईक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.या लकी ड्रॉच्या भाग्यवान विजेत्यांना सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.या वर्धापन दिन सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर ,दिलीप करेलिया आणि मनन परुळेकर यांनी केले आहे.