
•Sanjay Raut News : भाजपमध्ये 90 टक्के आमदार हे भंगार गोळा करून आणलेले आहेत”
मुंबई | शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर घणाघात करत तीव्र टीका केली आहे. “भाजप हा बकवास, ढोंगी आणि भ्रष्ट लोकांचा पक्ष असून, यांच्यासारखा देशद्रोही पक्ष या देशाच्या इतिहासात कधीच झाला नाही,” असा आरोप करत राऊतांनी भाजप नेतृत्वाला थेट आव्हान दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, “जे देशद्रोही ठरवले गेले, ज्यांच्यावर भाजपनेच आरोप केले — तेच आज भाजपमध्ये आहेत. उद्या मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी हे दाऊदला, छोटा शकीलला, टायगर मेननला घेऊन येतील. भाजपला काहीही थांबवत नाही. हे लोक देशासाठी नाही, केवळ सत्तेसाठी जगतात.”
राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य केलं. “तुम्ही राष्ट्रवादाच्या गप्पा मारता. आरएसएसचे लोक आहात म्हणता, मग मोहन भागवत यांनी या सगळ्यावर भूमिका मांडावी. भाजपने देशद्रोह्यांशी हातमिळवणी केल्यावरही तुम्ही शांत का?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
भाजपमध्ये स्वतःचं काहीच उरलेलं नाही. आमचं भंगार, आमची लोकं — तेच फोडून भाजप मजबूत झाला आहे. यांच्याकडे नितीमूल्यं राहिलेली नाहीत. सत्तेसाठी कोणत्याही थराला जातात. प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण, सलीम कुत्ता यांच्यावर आरोप करणारे आज त्यांनाच पक्षात घेत आहेत. मग कदाचित उद्या जेलमधून एखाद्याला बाहेर काढूनही पक्षात घेतील,” अशी उपरोधिक टीका करत राऊतांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

