
Sanjay Raut On KDMC Politics : ठाकरे गटाचे नगरसेवक फुटल्याने राऊत आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या तारीख पे तारीखवरही व्यक्त केली तीव्र नाराजी
कल्याण :- कल्याण-डोंबिवली महापालिकेत बहुमत गाठण्यासाठी मनसेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे KDMC यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाने या युतीवर सडकून टीका केली आहे. खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी या फोडाफोडीच्या राजकारणाचा निषेध करताना म्हटले की, “ज्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला आणि आता जे ‘बेडूक उड्या’ मारत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. सत्तापिपासू लोक आमच्यासाठी MIM (मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) सारखेच आहेत.”
अनिल परब आणि वरुण सरदेसाईंची भूमिका
मुंबईतील नगरसेवकांचा गट स्थापन करण्यासाठी अनिल परब आणि वरुण सरदेसाई कोकण भवन येथे पोहोचले होते. यावेळी परब म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीत मनसेने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे, मात्र आमचे नगरसेवक आमच्याशी एकनिष्ठ आहेत.” दरम्यान, नॉट रिचेबल असलेल्या डॉ. सरिता म्हस्के या आपल्या संपर्कात असून त्या लवकरच नोंदणीसाठी पोहोचतील, अशी माहिती वरुण सरदेसाई यांनी देऊन संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.
मनसेचे प्रत्युत्तर मनसे नेते राजू पाटील यांनी या युतीचे समर्थन करताना स्पष्ट केले की, “सत्तेत सामील झाल्याशिवाय विकासकामांसाठी काहीतरी पदरात पाडून घेता येत नाही.” तर बाळा नांदगावकर यांनीही ही केवळ स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून घेतलेली भूमिका असल्याचे म्हटले आहे.



