मुंबई

KDMC Political News : कल्याण-डोंबिवलीत ‘महा-पॉवर गेम’! ठाकरेंची साथ सोडून 2 नगरसेवक मनसेत; 2 नॉट रिचेबल; शिंदे-भाजपमध्ये ‘मोठा भाऊ’ होण्यासाठी चुरस

KDMC Breaking News : बहुमतासाठी फोडाफोडीचे राजकारण शिगेला; 9 नगरसेवक अज्ञात स्थळी; श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे गायब

कल्याण l कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या KDMC Election निकालानंतर सत्तेचे गणित जुळवण्यासाठी ‘घोडेबाजारा’ला उधाण आले आहे. ठाकरे गटाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले होते, परंतु त्यापैकी 4 नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने खळबळ उडाली आहे. स्वप्नील केणे आणि राहुल कोट या दोन नगरसेवकांनी पुन्हा आपल्या ‘होम ग्राऊंड’वर म्हणजेच मनसेत परतण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मनसेचे संख्याबळ 5 वरून 7 वर पोहोचले आहे. KDMC Election Latest News

दुसरीकडे, मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. निकालानंतर त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. मधुर म्हात्रे यांना शिंदे गटाने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवून विजय मिळवला होता, मात्र आता ते पुन्हा शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी या दोघांवरही अपात्रतेची कारवाई करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

सद्यस्थिती आणि संख्याबळ (KDMC – 122 जागा)

सत्तेसाठी मॅजिक फिगर 62 आहे. सध्याचे बलाबल खालीलप्रमाणे बदलले आहे:

पक्ष – जागा (निकाल) – सद्यस्थिती (अंदाजे)

शिवसेना (एकनाथ शिंदे) 53 – 53 + (2 संभाव्य)

भारतीय जनता पक्ष (BJP) 50 – 50

शिवसेना (UBT – ठाकरे गट) 11- 04 (4 फुटले)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) 05 – 07(2 घरवापसी)

इतर (काँग्रेस/राष्ट्रवादी) 03 – 03

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago