
KDMC News : रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंची रणनीती यशस्वी; भाजपचे 5 तर शिंदे गटाचे 4 उमेदवार विजयी
कल्याण | राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत कल्याण-डोंबिवलीतून (KDMC) महायुतीसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर आणि अर्जांच्या छाननीनंतर महायुतीचे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजपचे 5 आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे 4 उमेदवारांचा समावेश आहे. 122 सदस्यसंख्या असलेल्या केडीएमसीमध्ये बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे, ज्यातील 9 जागा महायुतीने आधीच खिशात टाकल्या आहेत.
भाजपची ‘विजयाची पंचक’
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने 5 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे.
बिनविरोध विजयी उमेदवार
रेखा राजन चौधरी (प्रभाग 18 अ)
आसावरी केदार नवरे (प्रभाग 26 क)
रंजना मितेश पेणकर (प्रभाग 26 ब)
मंदा पाटील
ज्योती पवन पाटील (प्रभाग 24 ब)
शिवसेना शिंदे गटाचे ‘चौकार’
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राजकीय खेळी येथे यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
बिनविरोध विजयी उमेदवार
रमेश म्हात्रे (पॅनल 24)
विश्वनाथ राणे (पॅनल 24)
वृषाली रणजित जोशी (पॅनल 24)
हर्षल राजेश मोरे (प्रभाग 28 अ) – हे आमदार राजेश मोरे यांचे चिरंजीव आहेत.
राज्यातील महायुतीची एकूण स्थिती
केवळ कल्याण-डोंबिवलीच नव्हे, तर राज्यभरात महायुतीची घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत राज्यात महायुतीचे एकूण 13 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत:
भाजप (8 जागा): केडीएमसी (5), धुळे (2), पनवेल (1).
शिवसेना शिंदे गट (5 जागा): केडीएमसी (4), जळगाव (1).
राष्ट्रवादी अजित पवार गट (1 जागा): अहिल्यानगर (1 – कुमार वाकळे).


