
KDMC Latest News : डॉ. इंदुराणी जाखड यांची अवघ्या एका वर्षात बदली, पालघर जिल्ह्याची मिळाली जबाबदारी
कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या KDMC Commissioner आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची अखेरीस बदली झाली आहे. पण त्यांचीही बदली जरी असली तरी बढती असल्याचं सांगितलं जात आहे. डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
17 नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2 वर्षांच्या कार्यकाळानंतर आता जाखड यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके 31 मार्च 2025 रोजी सेवा निवृत्त झाल्याने पालघरचे जिल्हाधिकारी पद रिक्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी डॉ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त असलेल्या इंदुराणी जाखड यांनी गेल्या काही वर्षांपासून शहरात धडाकेबाज निर्णय घेऊन बिल्डर लॉबीला चांगलाच दणका दिला होता. कल्याण डोंबिवली परिसरात अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. पण जाखड यांच्या एंट्रीनंतर कल्याण आणि डोंबिवली शहरात त्यांनी शिस्त लावण्याचे काम हाती घेतले.


