मुंबईठाणे
Trending

KDMC Mayor : कल्याण-डोंबिवलीत ‘एसटी’ आरक्षणाचा मोठा ट्विस्ट! मनसेच्या शीतल मंधारींना बसला ‘घाई’चा फटका? भाजपमध्ये अस्वस्थता

KDMC Political Latest News : राजू पाटलांच्या एका निर्णयामुळे मनसेची महापौरपदाची संधी हुकली? 50 नगरसेवक असूनही भाजप महापौरपदाच्या शर्यतीतून बाहेर?

कल्याण l कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत KDMC Election सत्तेची सर्व गणिते आज मंत्रालयातील आरक्षण सोडतीनंतर बदलली आहेत. महापालिकेत 50 जागा जिंकूनही भाजपचा महापौर बसणे आता तांत्रिकदृष्ट्या अशक्य झाले आहे, कारण भाजपच्या 50 नगरसेवकांमध्ये अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील एकही उमेदवार नाही. याच पार्श्वभूमीवर, मनसेचे नेते राजू पाटील यांनी घेतलेल्या घाईच्या निर्णयामुळे मनसेचा हक्काचा महापौर हातचा गेल्याची कुजबुज आता कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. KDMC Breaking News

काय आहे राजकीय गणित?

भाजपची स्थिती: 50 नगरसेवक, पण ‘एसटी’ प्रवर्गातील शून्य प्रतिनिधी.

मनसेची स्थिती: 5 नगरसेवक, ज्यामध्ये शीतल महेश मंधारी या ‘एसटी’ प्रवर्गातून निवडून आल्या आहेत.

शिवसेना (शिंदे गट): 53 नगरसेवक, ज्यामध्ये किरण भांगले आणि हर्षाली थविल हे ‘एसटी’ प्रवर्गातील सक्षम उमेदवार आहेत.

राजू पाटलांची ‘अति घाई’ भोवली?

राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, जर मनसेने भाजपला पाठिंबा दिला असता, तर भाजपकडे स्वतःचा ‘एसटी’ उमेदवार नसल्याने त्यांनी मनसेच्या शीतल मंधारी यांना महापौर पदावर बसवून सत्तेचा रिमोट आपल्या हातात ठेवला असता. मात्र, राजू पाटील यांनी बुधवारी घाईघाईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (शिंदे गट) बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आता शिंदे गटाकडे स्वतःचे 2 ते 3 ‘एसटी’ नगरसेवक असल्याने ते मनसेच्या उमेदवाराला महापौरपद देण्याची शक्यता कमी आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

भाजपला विश्वासात न घेतल्याचा फटका

निवडणुकीपूर्वी मनसे आणि भाजपमध्ये पडद्यामागून अनेक चर्चा झाल्या होत्या. मात्र, ऐनवेळी राजू पाटील यांनी भाजपला डावलून शिंदेंशी हातमिळवणी केल्याने भाजपमध्येही नाराजी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर राजू पाटील यांनी केलेली टीका आणि त्यानंतर बदललेली समीकरणे आता मनसेला महागात पडल्याचे बोलले जात आहे.

आता महापौर कोण होणार?

आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता शिंदे गटातील किरण भांगले किंवा हर्षाली थविल यांच्यापैकी एकाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. मनसेच्या शीतल मंधारी या शर्यतीत असल्या तरी, शिंदे गट आपल्या हक्काच्या नगरसेवकालाच प्राधान्य देण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0