मुंबईठाणे
Trending

KDMC Latest News : कल्याण-डोंबिवलीत मतदानाआधीच ‘कमळ’ फुललं! भाजपने नोंदवली विजयाची हॅट्रिक; तीन उमेदवार बिनविरोध विजयी

KDMC Latest News : रविंद्र चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात रंजना पेणकर यांची बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोनवरून अभिनंदन

कल्याण/डोंबिवली | कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत (KDMC Election 2026) मतदानापूर्वीच भारतीय जनता पक्षाने विजयाचा धमाका केला आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच भाजपने ‘विजयाची हॅट्रिक’ साधली असून, तीन महिला उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपला गड पुन्हा एकदा सुरक्षित असल्याचे सिद्ध केले आहे.

‘विजयाची हॅट्रिक’ करणारे भाजपचे शिलेदार

केडीएमसीच्या रणांगणात भाजपने खालील तीन जागांवर विनास्पर्धा विजय मिळवला आहे:

रेखाताई राजन चौधरी (प्रभाग क्र. 18): कल्याण पूर्वेतील या प्रभागातून त्यांनी आपली पकड मजबूत करत पहिला विजय मिळवून दिला.

आसावरीताई केदार नवरे (प्रभाग क्र. 26-क): डोंबिवलीतील या जागेवरून आसावरी नवरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

रंजना मितेश पेणकर (प्रभाग क्र. 26-ब): भाजपचा बालेकिल्ला असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून रंजना पेणकर यांनी तिसरा विजय नोंदवला. विशेष म्हणजे, हा तोच प्रभाग आहे जिथून रविंद्र चव्हाण पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट फोनवरून थोपटली पाठ

या ऐतिहासिक विजयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दोन्ही विजयी महिला उमेदवारांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. याचवेळी चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून विजयी उमेदवारांशी संवाद घडवून दिला. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही नवनिर्वाचित नगरसेविकांचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

केडीएमसीमधील जागावाटपाचे गणित

एकूण 122 जागांच्या या महापालिकेत महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र लढत आहेत:

भाजप: 56-57 जागांवर निवडणूक लढवत आहे (ज्यापैकी 3 जागा आधीच जिंकल्या आहेत).

शिवसेना (शिंदे गट): 65-66 जागांवर निवडणूक लढवत आहे.

सत्ता स्थापनेचा आकडा: बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0