KDMC Bribe News : कल्याण-डोंबिवली पालिकेत लाचखोरीचा सिलसिला कायम: 40 हजार घेताना अभियंता एसीबीच्या जाळ्यात!

KDMC Latest Bribe News : पेट्रोलपंपाच्या NOC साठी मागितली लाच;
कल्याण :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) पुन्हा एकदा लाचखोरीच्या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. KDMC Bribe News गुरुवारी (24 जुलै) पालिकेच्या जलनिस्सारण व मलनिस्सारण विभागाचा साहाय्यक अभियंता रवींद्र भीवसन अहिरे (57 वय) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) KDMC ACB Trap बिर्ला महाविद्यालय परिसरातील रस्त्यावर रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली असून, गेल्या तीस वर्षांत लाचखोरीत अडकलेल्या पालिका कर्मचाऱ्यांची संख्या आता 45 वर पोहोचली आहे. KDMC Latest Crime News
काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील तक्रारदार हे कल्याण शहरात श्री समर्थ पेट्रोलिंक्स पेट्रोलपंप सुरू करण्याच्या तयारीत होते. यासाठी त्यांना पालिकेच्या जलनिस्सारण व मलनिस्सारण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राची (NOC) आवश्यकता होती. हे प्रमाणपत्र देण्यासाठी अभियंता अहिरे याने गेल्या आठवड्यात तक्रारदाराकडे 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच दिल्याशिवाय प्रमाणपत्र देण्यास तो टाळाटाळ करत होता.
तक्रारदाराने तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाकडे याची तक्रार केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, अहिरे तडजोडीने 40 हजार रुपयांची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी दुपारी कल्याणमधील बिर्ला महाविद्यालय प्रवेशद्वारासमोरील बस थांब्याजवळ लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरले. ठरल्यानुसार, साध्या वेशातील एसीबीच्या पथकाने सापळा लावला होता. ठरलेल्या वेळी रवींद्र अहिरे आपल्या वाहनातून बस थांब्याजवळ आले आणि त्यांनी पेट्रोलपंप चालकाकडून लाचेची रक्कम स्वीकारताच, पथकाने त्यांना वाहनातच रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक अनिल जयकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. अहिरे विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


