क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

KDMC Bribe News : कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराची कीड ; पालिकेच्या लिपिकास लाच घेताना अटक

Thane ACB Arrested Bribe KDMC Employee : तक्रारदाराकडून दीड हजार रूपये घेताना लिपिक संतोष पाटणे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

कल्याण :- कल्याण डोंबिवली पालिकेच्या नागरी सुविधा केंद्र, ‘आय’ प्रभाग समिती विभागातील लिपिक संतोष गजानन पाटणे (52 वय) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दीड हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार यांना विवाह नोंदणी (मॅरेज सर्टिफिकेट) काढण्यासाठी कागदपत्रांच्या यादीमध्ये साक्षीदार हा नातेवाईक नसल्याने लिपिक यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. Thane ACB Arrested Bribe KDMC Employee

तक्रारदार यांनी, त्यांचे मानलेल्या भावाचे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जातील साक्षीदार हे स्थानिक व नात्यातील नसल्यामुळे साक्षीदार न बदलता विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यासाठी यातील संतोष गजानन पाटणे, (वय 52), पद लिपिक, नागरी सुविधा केंद्र, ‘आय’ प्रभाग समिती, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण, खडेगोळवली हे तकारदार यांचेकडे दोन रु लाचेच्या रक्कमेची मागणी करीत असल्याने यातील तक्रारदार यांनी संतोष गजानन पाटणे, यांचे विरूध्द कारवाई करण्याकरिता ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे येथे 8 एप्रिल रोजी लेखी तकार दिलेली आहे. KDMC Latest Bribe News

तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी (9 एप्रिल) रोजी केलेल्या पडताळणी कारवाई मध्ये यातील संतोष पाटणे, यांनी तक्रारदार यांना त्यांचे मानलेल्या भावाचे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र हे अर्जातील साक्षीदार न बदलता लवकरात लवकर देण्यासाठी तकारदार यांचेकडे दीड हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबीने सापळा रचून दीड हजार रुपयांचे लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहाथ पकडले आहे.पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0