Kashmira Police Station : गुंगीचे औषध देऊन 81 हजार रूपयांच्या सोन्याच्या दागिन्याची चोरी

Crime Branch Unit 1 Kashmira Police Arrested Robbers : गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा पोलिसांना यश ; सराईत आरोपी अटकेत 4 गुन्ह्यांची उकल
मिरा रोड :- एम.टी.एन.एल. रोड शांती पार्क मिरारोड पुर्व, येथे फिर्यादी येथून जात असताना त्याना अविनाश या आरोपीने गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि त्याच्या गळ्यातील चैन, दोन अंगठ्या आणि रोग रक्कम असा एकूण 81 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची तक्रार अविनाश यांनी मिरा रोड पोलीस ठाण्यात Mira Road Police Station दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बीएनएस 2023 कलम 123,305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्याचा उलगडा करण्याकरिता पोलिसांनी गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष -1, काशिमीरा पोलिसांनी Kashmira Police Crime Beanch Unit 1 सुरू केला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीचा तपास घेत असताना पोलिसांना सराईत आरोपी अविनाश उर्फ अभिषेक सत्यनारायण अग्रवाल (38 वय रा. राहुल पार्क भाईंदर पूर्व) हा असल्याचा निष्पन्न झाले. पोलिसांनी शिताफीने आरोपी अविनाश याला अटक केली आहे. अविनाश उर्फ अभिषेक याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्तदत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त., गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, अविनाश गर्जे, पुष्पेंद्र थापा, संतोष लांडगे, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, सचिन हुले, अश्विन पाटील पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, गौरव बारी, सौरभ इंगळे, धिरज मेंगाणे सचिन चौधरी तसेच संतोष चव्हाण सायबर गुन्हे शाखा यांनी केली.