क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Kashmira Crime Branch : सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला काशिमिरा गुन्हे शाखेने 24 तासांत ठोकल्या बेड्या

Kashmira Crime Branch Arrested Robbers : भाईंदरमधून आरोपी ताब्यात; 2.5 लाखांचा ऐवज चोरीला गेला होता; आरोपीचा मोठा गुन्हेगारी रेकॉर्ड

मीरा रोड :- नयानगर पोलीस ठाणे Nayanagar Police Station हद्दीत घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला काशिमिरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (कक्ष-1) Kashmira Crime Branch Unit 1 अवघ्या 24 तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. Mumbai Latest Crime News

24 ऑक्टोबर 2025 रोजी फिर्यादी मोईन इंजाज खान यांच्या राहत्या घरामध्ये एका अज्ञात चोरट्याने खिडकीवाटे प्रवेश करून अंदाजे 2 लाख 53 हजार 500 रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरी केली होती. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 331(4) आणि 305 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

वरिष्ठांच्या आदेशानुसार दाखल गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-1, काशिमिरा येथील पथकाने सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीला निष्पन्न केले. गुप्त बातमीदारांकडून त्याच्या ठावठिकाणाबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी बहरूल नूर इस्लाम तरफदार (वय 26, रा. भाईंदर, मूळ रा. पश्चिम बंगाल) या आरोपीस भाईंदर पश्चिम येथून शिताफीने ताब्यात घेतले.

तपासात आरोपी बहरूल नूर इस्लाम तरफदार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नवघर आणि नयानगर पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीस पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी नयानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-1, काशिमीरा येथील प्रभारी पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0