Kashigaon Police Latest News : मुख्य आरोपी निजाम शेख जून 2025 पासून होता फरार; मुंबईत त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल ; अटक आरोपी निजाम शेख आणि त्याची पत्नी शाबिरा शेख; फसवणुकीची मोठी साखळी उघडकीस येण्याची शक्यता
मीरा-भाईंदर :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ अर्थात ‘म्हाडा’ (MHADA) च्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून लोकांना फ्लॅट आणि दुकाने विकून गंडा घालणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय आरोपीला त्याची पत्नीसह अटक करण्यात काशिगाव पोलीस ठाण्याच्या Kashigaon Police Station गुन्हे प्रकटीकरण शाखेला मोठे यश मिळाले आहे. Mira Bhayandar Latest Crime News
नेमका गुन्हा काय घडला?
मिरारोड येथील एका गृहिणी तक्रारदार (वय 42) यांना आरोपी निजाम शेख आणि त्याची पत्नी शबीरा शेख (रा. जोगेश्वरी, मुंबई) यांनी दिनांक 14 ऑक्टोबर 2024 ते 15 जून 2025 या कालावधीत महावीर नगर, कांदिवली येथे म्हाडाच्या स्कीम अंतर्गत व्यवसायासाठी गाळा देतो, असे आमिष दाखवले. Mira Bhayandar Latest Fraud News
आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून एकूण 32 लाख 83 हजार 674 इतकी मोठी रक्कम घेतली आणि म्हाडाच्या गाळ्याचे बनावट कागदपत्रे दिले. मात्र, गाळा न देता आरोपी फोन बंद करून पळून गेले. तक्रारदार यांनी म्हाडा कार्यालयात जाऊन खात्री केली असता, निजाम शेखने दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले.या फसवणुकीप्रकरणी काशिगाव पोलीस स्टेशन येथे निजाम शेख व त्याची पत्नी शबीरा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सराईत आरोपी जेरबंद
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आणि आरोपी जून 2025 पासून फरार असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले. काशिगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक कौशल्य वापरून आरोपींचा शोध घेतला.
पोलिसांनी मुख्य आरोपी निजाम जमील शेख (वय 43, व्यवसाय इस्टेट एजंट, रा. मुंब्रा, ठाणे) आणि त्याची पत्नी शाबिरा निजाम शेख (वय 39) यांना अटक केली आहे.
तपासात निष्पन्न झाले आहे की, अटक आरोपी निजाम शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याने म्हाडाच्या नावे फ्लॅट आणि शॉप्स देतो असे सांगून अनेक लोकांची फसवणूक केली आहे. यापूर्वी त्याच्याविरुद्ध बोरिवली, साकीनाका, कस्तुरबा, खेरवाडी आणि वसई पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.काशिगाव पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे हे पुढील तपास करत आहेत.
पोलिसांचे जनतेला आवाहन
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की:
म्हाडा किंवा बीएसयूपी योजनेअंतर्गत घर आणि शॉप मिळण्याकरिता कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थी माणसाची गरज नसते.
नागरिकांनी स्वतः संबंधित कार्यालयात जाऊन खात्री करूनच व्यवहार करावेत.
जर अशाच प्रकारची फसवणूक झाली असल्यास, त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन आपली तक्रार नोंदवावी.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…