क्राईम न्यूजमुंबई

Kashigaon Police News : काशीगांव पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाची मोठी कारवाई ; चक्क श्रीलंकेतील खुन्यातील आरोपीला अटक

Kashigaon Police News: ऑपरेशन ऑल आउट कोबिंग अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई, श्रीलंकेतील खुन्यातील जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीला मिरा रोड येथून अटक

मिरा रोड :- पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1, मिरा रोड यांनी ऑल आऊट कोबिंग ऑपरेशन 06 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान राबवण्यात आले होते. या ऑपरेशन दरम्यान काशिगांव पोलिसांच्या गुन्हे kashigaon Police Crime Beanch प्रकटीकरण पोलिसांनी धडक कारवाई करून चक्क श्रीलंकेत खुनाच्या गुन्हयातील जामिनावर असलेल्या आरोपीला काशीगांव पोलिसांच्या हद्दीत अटक करण्यात आली आहे.

श्रीलंकेतील आरोपीला मिरा रोडच्या काशीगांव पोलीस ठाण्यात अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे, किरण बघड़ाणे, पोलीस हवालदार प्रताप पाचुंदे, पोलीस शिपाई नामदेव देवकते उमंग चौधरी, सुनिल ठाकुर असे कोम्बींग ऑपरेशच्या अनुषंगाने पाहिजे व फरारी आरोपी पकडणे, हिस्ट्रीशिटर यांच्यापर निगराणी ठेवणे तसेच पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल व लॉजची तपासणी इत्यादी कर्तव्य पार पाडत असतांना वेस्टर्न हॉटेल/लॉजींग, काशिगाव, येथे हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या नोंदीचे रजीस्टर तपासणी करीत असतांना तेथील लॉजींग मॅनेजर अल्ताफ शेख यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी पोलीस उपनिरीक्षक लांड यांना त्यांच्या ग्राहकामध्ये दिनेशकुमार हा संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक लांडे यांनी दिनेश कुमार अय्यर (वय 36) या व्यक्तीचे आधारकार्ड चेक केले असता आधारकार्ड संशयास्पद असल्याचे पोलीस उपनिरीक्षक लांडे यांना दिसून आले. त्यांनी हॉटेल मॅनेजर यांना दिनेश कुमार यांचा रुम चेक करायचे असे सांगुन तो राहत असलेल्या रुम क्रमाक 306 येथे मॅनेजर सह गेले, त्याठिकांणी दिनेश कुमार अय्यर याचेकडे विचारपुस करत असतांना त्याने त्याचे मुळ राहण्याबाबत पत्ता तो सांगू शकला नाही.

पोलीस उपनिरीक्षक लांडे यांना त्या व्यक्तीचे हावभाव बोलचाल बाबत संशय बळावल्याने त्याचाकडे अधिकची चौकशी केली असता त्याने तो श्रीलंका देशाचा नागरीक असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यास विश्वासात घेवून त्याचे मूळ नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अरुमाहद्दी जनिथ मदुसंघा डिसिल्या (36 वय रा. एन ०६, टेम्पल रोड, टेलवाधा, देश श्रीलंका) असे सांगितले. त्याचे सदर विकाणी येणेबावतचे कारणं व शासकीय परवानगी, पासपोर्ट व्हिसा याबाबत त्यास विचारणा केली असता त्याचेकडे भारत देशामध्ये येण्याचे कोणतेही परवानगी पासपोर्ट व व्हिझा नसल्याचे त्याने सांगितले. त्यास पोलीस उपनिरीक्षक किरण बधडाणे यांनी भारतामध्ये कोणत्या प्रवासीसाधनाचा वापराने प्रवेश केला असे विचारले असता त्याने 31 डिसेंबर 2024 रोजी समुद्रामार्गे चोटीतून भारतीय तटरक्षक दलाची नजर चुकवून भारतामध्ये तामिळनाडू राज्यामध्ये प्रवेश करून, तामिळनाडू राज्यातुन बस व रेल्वेने मुंबई, ठाणे येथे आल्याचे सांगितले.तसेच त्याला भारतात येण्याचा उद्देश काय आहे याबाबत त्याच्याकडे तपास केला असता त्याने सन 2015 मध्ये स्थानिक टोळीच्या वादातून श्रीलंकामध्ये खुनाचा गुन्हा केला असुन त्या गुन्ह्यात डिसेंबर 2024 मध्ये श्रीलंकेच्या न्यायालयाने त्याला त्यांच्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. जामीनावर श्रीलंकेच्या तुरुगाच्या बाहेर आल्यावर तो आश्रया करिता भारतात आला असल्याचे त्याने सांगितले आहे.तरि नमुद विदेशी नागरीकास ताब्यात घेवून त्याच्या विरुद्ध काशिगांव पोलीस स्टेशन अटक आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून त्याच्याकडे त्याला भारतात प्रवेश करण्याकरिता कोणी मदत केली तसेच त्याच्याकडे असलेले आधारकार्ड, मोबाईल सिमकार्ड त्याला कोणी दिले. याबाबत तपास काशिगांव पोलीस स्टेशनचे दहशतवाद विरोधी कक्षाचे पोलीस उप निरीक्षक सचिन शेंडगे हे करत आहे.

पोलीस पथक

प्रकाश गायकवाड, पोलिस उप आयुक्त परिमंडळ-1, डॉ विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरा रोड विभाग, महेश तोगरवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काशिगांव पोलीस ठाणे, किरण बघडाणे, अभिजीत लांडे, पोलिस उप निरीक्षक, गुन्हे प्रकटीकरण शाखा तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोलीस हवालदार प्रताप पांचुदे, पोलीस शिपाई विक्रांत खंदारे, उमंग चौधरी,किरण विरकर, रविन्द्र सोनवणे, पोलीस शिपाई नामदेव देवकाते, आभिषेक मढावी, सुनिल ठाकुर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0