Kashigaon Police Latest News : चेनागाव सिग्नलजवळ पोलिसांनाही ‘टोपी’ घालण्याचा प्रयत्न; कंपनीचे पैसे गिळंकृत करण्यासाठी रचला कट, 24 तासांत गुन्हे शाखेने सत्य आणले बाहेर
काशीगाव :- ‘दोन तोतया पोलिसांनी गाडीच्या डिक्कीतून रोकड काढली’ अशी खोटी तक्रार देणारा इसमच आपल्या बांधकाम कंपनीच्या पैशांचा अपहार करण्याच्या प्रयत्नात असलेला मुख्य आरोपी निघाला आहे. काशिगाव पोलीस Kashigaon Police Crime Branch ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाने अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा छडा लावत फिर्यादी आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक केली असून, फसवणुकीचे 2.23 लाख हस्तगत केले आहेत. Kashigaon Police Latest Crime News
खोटी तक्रार अन् सत्य
दिनांक 8 डिसेंबर रोजी सुशांत दशरथ मोहिते (वय 36, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) याने काशिगाव पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली होती. घोडबंदर रोडवर काजूपाडा सिग्नलजवळ खाकी गणवेशातील दोन पोलिसांनी त्याला थांबवून, गाडीच्या डिक्कीतील कामगारांच्या पगाराचे 2.23 लाख काढून घेतले आणि त्याला मारहाण करून पळ काढला, असे त्याने फिर्यादीत म्हटले होते.
गुन्ह्याचा प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठांनी तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले. काशिगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळ आणि फिर्यादीकडे अत्यंत कौशल्यपूर्ण आणि सखोल चौकशी केली. यात फिर्यादी सुशांत मोहिते यानेच त्याच्या काम करत असलेल्या कंपनीच्या पैशांचा अपहार करण्याकरिता ही संपूर्ण योजना आखून खोटा गुन्हा दाखल केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फिर्यादी सुशांत दशरथ मोहिते आणि त्याचा साथीदार राणू उर्फ ओंकार अंकुश भदगे (वय 29) या दोघांना अटक केली. या आरोपींकडून चोरी गेलेली संपूर्ण 2.23 लाख रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…