Kanjurmarg Crime News : कांजुरमार्ग येथली ‘त्या’ हत्येचे गूढ उलगडले, दोघांना अटक
•कांजूरमार्ग येथील 42 वर्षीय व्यक्तीची हत्याप्रकरणी दोघांना पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींना कांजूरमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रोहित राजेश चंडालिया आणि सागर राजेश पिवाळ अटक करण्यात आली आहे
मुंबई :- कांजूरमार्ग येथील राजेश मनबिनसिंग सारवान (42 वय) यांची डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले करण्यात पोलिसांना यश आले आहे. हत्या केल्याप्रकरणी दोघांना पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपींना कांजूरमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी याप्रकरणी कंजूमर पोलीस ठाण्यात सोमवारी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.कांजूरमार्ग मेट्रो कारशेड परिसरात रविवारी राजेशचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवला.शवविच्छेदन अहवालात मृत व्यक्तीच्या डोक्यावर प्रहार करण्यात आल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी याप्रकरणी पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दूरध्वनी आला होता. एक व्यक्ती कारशेड परिसरात जखमी अवस्थेत पडल्याचे कांजूरमार्ग पोलिसांना कळवण्यात आले. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्धावस्थेत राजेशला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करीत होती. तपासात रोहित राजेश चंडालिया (29 वय) व सागर राजेश पिवाळ (30 वय ) यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना पकडून कांजूरमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन्ही ओरोपी विलेपार्ले पूर्व येथील रहिवासी आहेत.
पोलीस पथक
पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त (बृहन्मुंबई) देवेन भारती,पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशि कुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-1) विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम) प्रशांत राजे, सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पूर्व) चंद्रकांत जाधव यांच्या, मार्गदर्शनाखाली कक्ष-7 प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, कक्ष-10 प्रभारी पोलिस निरीक्षक दिपक सावंत, कक्ष-8 प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, कक्ष 6 प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे, धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर हे कक्ष 7 चे अधिकारी व सर्व अंमलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर धुतराज, संग्राम पाटील, राहुल प्रभु, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, कानडे हे कक्ष-8 चे अधिकारी व सर्व अंमलदार, कक्ष-6 चे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, सचिन गावडे, कक्ष-9 चे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे, कक्ष-10 चे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित नार्वेकर, कक्ष-11 अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम यादव, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी पार पाडली आहे.