Kangana Ranaut : हिमाचल प्रदेशातून निवडून आलेल्या खासदार अभिनेत्री कंगना राणौतने दिल्लीतील महाराष्ट्र सदन मधील मुख्यमंत्र्यांच्या रूमची केली मागणी

Sanjay Raut on Kangana Ranaut : शिवसेना ठाकरे गटाकडून खोचक टीका करत प्रतिक्रिया, राऊत यांचा कंगनावर निशाणा..
मुंबई :- वादग्रस्त विधाने चर्चेत असलेल्या बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतने Kangana Ranaut दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील मुख्यमंत्री यांचे सूट रूम मागितल्याने ठाकरे गटाकडून जोरदार टीका केली आहे.लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री कंगना रणौतने Sanjay Raut खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधीनंतर नवनियुक्त खासदार व अभिनेत्री कंगना रणौतने दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला भेट दिली. मात्र आता कंगनाची ही भेट वादात सापडली आहे. यावेळी कंगनाने थेट महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सूट (प्रशस्त खोली) मागितला. रूम छोट्या असल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांची रूम मिळावी, अशी मागणी कंगनाने केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरुन कंगनावर निशाणा साधला. खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत टीका केली आहे. Sanjay Raut on Kangana Ranaut
संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की
बापरे!..श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडूनआल्याआहेत.त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी.हिमाचलभवनयेथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजीना मिळतअसेलतर काहीच हरकत नाही.महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत रहातआहेत श्रीमतीजी…
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की,
..हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. हिंदुत्वासाठी अहोरात्र झगडणार्या कंगनाजी जर महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट मागत असतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हिंदुत्वासाठी सुटच काय CMपदाची खुर्ची कुर्बान करावी लागली तरी अजिबात मागे हटू नये..! अशी खिल्ली उडवत सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.