पनवेल जितिन शेट्टी – कामोठे पोलीस ठाण्याच्या kamothe Police Station हद्दीतून हरवलेले विविध कंपन्यांचे तब्बल ४२ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. Navi Mumbai Pollice Latest News
या जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत ७ लाख ७३ हजार रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोलीस हवालदार झोळ, पोलीस शिपाई कोकाटे, पोलीस शिपाई इलग आणि पोलीस शिपाई गायकवाड यांच्या पथकाने सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने हे हरवलेले मोबाईल विविध राज्यांतून शोधून काढले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या उपस्थितीत मंगळवारी हे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना वाटप करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी कामोठे पोलीस ठाण्याच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…