Kamothe News : श्री हनुमान मंदिर जुई जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.
कामोठे (जितीन शेट्टी):-जय हनुमान आगरी समाज ग्रामस्थ मंडळ जुई आयोजित श्री हनुमान मंदिर जुई जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न. दि :-19 ते 22 एप्रिल 2024 जय हनुमान आगरी समाज ग्रामस्थ मंडळ जुई आयोजित श्री हनुमान मंदिर जुई जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. हरिनाम, हरिपाठ श्री हनुमान मूर्ती व श्री बाळ गोपाळ मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, हरिकिर्तन, ग्रंथवाचन अभंगवाणी, श्री हनुमान मूर्तीची भव्य मिरवणूक, ग्रामप्रदक्षिणा तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. तसेच याप्रसंगी स्थानिक नगरसेवक मा. श्री. विकास घरत जातीने सर्व व्यवस्था पाहत होते.
तसेच सर्व ग्राम सदस्य, भाविक यांनी पूर्ण परिसर भरून गेला होता. असे वाटत होते की आपण राम अयोध्या मध्येच आलेलो आहोत. सगळीकडे लायटिंगची रोशनाई सगळीकडे एक अनोखे असे वातावरण तयार झालेले पहावयास मिळाले.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य संघटक मा. श्री. उमेश भोपी तसेच मा. सौ. कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष तसेच आमंत्रित मा. श्री. प्रल्हाद चव्हाण साहेब ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि RPS स्टार न्युज चे राष्ट्रीय अध्यक्ष संपादक व पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष संपादक मा. श्री प्रल्हाद चव्हाण साहेब यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व गावकऱ्यांची एकी पहावयास मिळाली. गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून तसेच काही धनाड्य लोकांनी केलेल्या (नावाची वाच्यता न करता) मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी दिलेला आहे.
लोकांच्या भाविकांच्या एकीचे उदाहरण देत असतानाच जुई गावामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न सामोरे आला. काही किरकोळ कारणांमुळे हे काम प्रलंबित राहिल्याचे पहावयास मिळत आहे. मा. श्री. विकास घरत यांनी हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे आश्वासन दिले.