•Kalyan Train Accident News : चोरट्याने लोखंडी पट्टीने मारले, मोबाईल हिसकावून पळून गेला; गंभीर घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
कल्याण :- कल्याण जवळील शहाड-आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांनी डोके वर काढले आहे. तपोवन एक्सप्रेसच्या दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करणाऱ्या नाशिकच्या एका शेतकऱ्याच्या हातावर अल्पवयीन चोरट्याने लोखंडी पट्टीने जोरदार फटका मारला. या घटनेत तोल जाऊन खाली पडल्याने संबंधित शेतकऱ्याला आपला एक पाय गमवावा लागला आहे. चोरट्याने त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला आहे.
या घटनेमुळे शहाड, आंबिवली आणि विठ्ठलवाडी रेल्वे मार्गालगत चोरट्यांचा सुळसुळाट पुन्हा एकदा समोर आला आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे लोखंडी सळई किंवा पट्टीने प्रवाशांच्या हातावर मारून मोबाईल आणि पाकीट हिसकावून पळून जाण्याच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे या भागात पोलिसांची गस्त नेहमीच असते, असे असतानाही ही घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय घडले नेमके?
नाशिक येथील शेतकरी गौरव रामदास निकम (वय 22) हे मुंबईतील कामे आटोपून रविवारी तपोवन एक्सप्रेसने नाशिकला परत जात होते. ते एक्सप्रेसच्या दरवाजाजवळ उभे राहून मोबाईलवर बोलत असताना शहाड-आंबिवलीदरम्यान रेल्वेचा वेग कमी झाला. त्याच वेळी रेल्वे मार्गाजवळ उभ्या असलेल्या एका अल्पवयीन चोरट्याने त्यांच्या हातावर लोखंडी पट्टीने जोरदार फटका मारला. हाताची पकड सुटल्याने गौरव निकम एक्सप्रेसमधून खाली पडले आणि त्यांचा एक पाय रुळाखाली आल्याने त्यांना तो गमवावा लागला. त्यांना दुसऱ्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे.
चोरट्याने त्यांचा मोबाईल आणि रोख रक्कम घेऊन लगेच पळ काढला. लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ गौरव निकम यांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी या परिसरातील गुन्हेगारांचा शोध सुरू केला आहे. या गंभीर घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…